Advertisement

आंबेगाव येथे मरूरे परिवाराच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न सद्गुरू गहीनीनाथ महाराज औसेकर यांच्या किर्तनाने सांगता

 आंबेगाव येथे मरूरे परिवाराच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न 

सद्गुरू गहीनीनाथ महाराज औसेकर यांच्या किर्तनाने सांगता




मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174

निलंगा : निलंगा तालुक्यातील आंबेगाव (मसलगा) येथील दासराव यादवराव मरूरे परिवाराच्या वतीने काशी मामदे पुजन, ग्रंथ पारायण वाचन व भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. व याची सांगता विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती पंढरपूर चे सहअध्यक्ष सद्गुरू गहीनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभहस्ते महाआरती व काल्याच्या किर्तनाने झाली.

 या सोहळ्यात दररोज सकाळी १० ते २ वेदमुर्ती सतीष पुराणिक गेवराई उपस्थितीत ग्रंथ पारायण वाचन व २ ते ५ या वेळेत गेवराई तालुक्यातील राजपिंपरी येथील भागवत कथा प्रवक्ते भाऊसाहेब महाराज जोशी यांच्या उपस्थितीत भागवत कथा सोहळा संपन्न झाला. व काशी मामदे पुजा हवन पुरूषोत्तम बाबुदेव जोशी निटुरकर यांनी केले व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा सांगते निमित्ताने सद्गुरू गहीनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते महाआरती व काल्याचे किर्तन संपन्न झाले. व महाप्रसादाने सोहळा संपन्न झाला. तसेच यावेळी दासराव मरूरे, उपसरपंच प्रविण मरूरे, चेअरमन प्रमोद मरूरे, शिक्षक प्रशांत मरूरे आदीसह मरूरे परिवारातील सदस्यांनी सद्गुरू गहीनीनाथ महाराज औसेकर यांचे आशीर्वाद घेतले. या सोहळ्यात आंबेगावातील सर्व महिला, पुरुष, युवकांनी मोठा उत्साहाने सहभाग घेतल्याने गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

या सोहळ्याला निलंगा विधानसभा मतदारसंघाचे कॉग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अशोकराव पाटील निलंगेकर, कॉग्रेस च्या डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष आरोग्यदुत डॉ अरविंद भातांब्रे, निलंगा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन शिंदे, मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ, दापका सरपंच लाला पटेल, बसपुर चेअरमन गंगाधर दाजी चव्हाण, लोकमान्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विक्रम पाटील, शेंद चे माजी सरपंच बालाजी मोगरगे, माधवराव पाटील अंबुलगेकर आदीसह निलंगा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती.



Post a Comment

0 Comments