Advertisement

मौजे बोटकुळ – रस्ता खुला करून भूमिपूजन कार्यक्रम संपन्न

 मौजे बोटकुळ – रस्ता खुला करून भूमिपूजन कार्यक्रम संपन्न



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


निलंगा : मौजे बोटकुळ ता.निलंगा येथील सर्वे नंबरवरील बंद रस्ता आपसात तडजोडीने मिटवून आज रस्ता खुला करण्यात आला. संबंधित रस्त्याचे भूमिपूजन मा. अप्पर जिल्हाधिकारी करमनकर मॅडम यांच्या शुभहस्ते पार पडले.

या कार्यक्रमास मा. उपविभागीय अधिकारी श्री. शरद झाडके, मा. तहसीलदार श्री. प्रसाद कुलकर्णी, मंडळ अधिकारी श्री. अमोल सोमवंशी, ग्राम महसूल अधिकारी श्री. बाबुराव माने, मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, तसेच प्रकरणातील वादी–प्रतिवादी व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना मा. अप्पर जिल्हाधिकारी मॅडम यांनी गावातील वाद गावातच सामंजस्याने मिटवावेत व शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी स्थानिक महसूल विभाग आणि ग्रामस्थांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments