Advertisement

सिलेंडर हाॅटेलवर तर लाभधारक गॅसवर आणि उज्वला पुन्हा वळल्या चुलीकडे हंडरगुळी परिसरातील चिञ

 सिलेंडर हाॅटेलवर तर लाभधारक गॅसवर आणि उज्वला पुन्हा वळल्या चुलीकडे 

हंडरगुळी परिसरातील चिञ



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9420010756


हंडरगुळी : केंद्र शासनाने कांही वर्षापुर्वी उज्वला नावाने गॅस योजना सुरु केल्यामुळे घरोघरी असलेल्या चुली व पसरणारा धुर गायब झाला होता. व या योजनेचा फायदा गावखेड्यात असंख्य कुटूंबाने घेतला.कालांतराने गॅसच्या किंमती वाढल्या.तसेच भाव वाढूनही वेळेत सिलेंडर मिळत नाही म्हणुन हंडरगुळी परिसरातील अनेक उज्वला पुन्हा सरपण गोळा करुन जुनं ते सोनं असे म्हणत चुली पेटवू लागल्याचे आणि सिलेंडर हाॅटेलवर पेटू लागल्याचे गावोगावी दिसून येते. आणि याची कल्पना असुनही अन्न व नागरी पुरवठा विभाग तहसील कार्यालय उदगीर हे डोळेझाक करत असल्याने यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता गॅसच्या लाभार्थ्यांना योग्य दरात व वेळेत गॅस देणे बंधनकारक असून जो कुणी या नियमांचे उल्लंघन करेल त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती उदगीर तहसीलच्या पुरवठा निरिक्षण अधिकारी सुमिञा इलमले यांनी देऊन १५ दिवस झाले तरीही आजवर कारवाई तर दुरंच साधी चोकशी ही केलु नाही.यामुळे प्रशासनाचे आणि हंडरगुळी येथील सब डिलर्सचे कनेक्शन काय?असा सवाल उपस्थित झाला असून याकडे वरिष्ठ तरी लक्ष देतील का?याकडे उज्वलांसह अन्य गॅस ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

हंडरगुळी सह आसपासच्या खेड्यात बहूतांश माता,भगीणी रानावनातुन जळन आणून चुलीवर स्वयंपाक इ. करायच्या म्हणुन घरासह महिलांचे डोळे व शरीरही काळवंडायचे.परंतू, कांही वर्षापुर्वी मोठी पब्लिसिटी करुन केंद्राने उज्वला गॅस ही योजना सुरु केली.आणि या योजनेमुळे गरीब मजुर वर्गही गॅस वापरु लागला.अण् घरोघरच्या मातीच्या चुली व धूर बंद झाल्याने घरासह महिलांचे डोळे व शरीर चांगले राहू लागले.पण कांही काळानंतर गॅसच्या किंमती वाढल्या तसेच किंमती वाढूनही वेळेवर गॅस मिळण्याऐवजी वाढीव दाम घेऊन हंडरगुळीतील सब डिलर्स गॅसटाक्या  लग्नात,हाॅटेलात विकू लागले.म्हणुन रोज २००,३०० रु.ची मजुरी करणारे कुटूंबिय हैराण झाले आणि नको हा महागडा गॅस आपली चूलच बरी. असे म्हणुन सरपण गोळा करु लागल्या आणि उज्वला पुन्हा जुनं ते सोनं असे म्हणत चुलीकडे वळल्या. आणि याची पुर्ण कल्पना असुनही तहसीलचा पुरवठा विभाग गप्प का?

Post a Comment

0 Comments