महिन्यापासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या संस्कारने घेतला अखेर जगाचा निरोप
निलंगा: तब्बल एक महिन्यापासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या संस्कार विश्वास उजने वय वर्ष 8 रा. कोकळगाव ता.निलंगा यांनी मृत्यूशी झुंज देत अखेर जगाचा निरोप घेतला. मुम्बई येथील KEM हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मावळली.
संस्कार उजने यास विल्सन डीसिज हा दुर्मिळ आनुवंशिक आजार झाला होता, त्यामुळे हैद्राबाद येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. प्रतिकूल परिस्थिती मुळे परिसरातील नागरिकांनी सोशल मीडियावर मदतीचा संदेश फिरवल्याने अनेक नागरिकांनी संस्कार साठी आर्थिक मदत केली होती त्यामुळे पुन्हा त्यांना मुंबई येथील हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते.त्यांची प्रकृती बिघडली होती. खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. गेल्या आठवड्यात त्यांना मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र शनिवारी सकाळी त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, आजोबा आजी असा परिवार आहे.
त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.रविवारी कोकळगाव येथे त्याच्यवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
0 Comments