Advertisement

बदली झालेल्या प्रिय शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थी गहिवरले, तर ग्रामस्थही भावूक.

 बदली झालेल्या प्रिय शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थी गहिवरले, 

तर ग्रामस्थही भावूक.



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174



 निलंगा : मागील दहा वर्षांपासून निलंगा तालुक्यातील कोकळगाव पूर्व येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या मुख्याध्यापिक दिपक कांबळे, सह शिक्षक विरेंद्र चामे व सह शिक्षिका वंदना कांबळे यांची शाळेतून बदली झाली असल्याकारणानें,

 प्रिय शिक्षकाला निरोप देताना विद्यार्थी गहिवरले, शिक्षकासही अश्रू अनावर

झाले.यावेळी शाळेत नव्याने रुजू झालेले शिक्षक  यांचा सत्कार करून स्वागत करण्यात आले.विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते घट्ट असते. विद्यार्थ्यांचा अधिक वेळ शिक्षकांच्या सहवासातच जातो. त्यामुळे शिक्षणाची गोडी निर्माण करणाऱ्या शिस्तप्रिय शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये एक जिव्हाळा निर्माण होतो. असे मत महाराष्ट्र विद्यालय मुदगड एकोजी शाळेतील आदर्श शिक्षक प्रविण गिरी यांनी व्यक्त केले.तर अनेक मान्यवर आणि ग्रामस्थांनीही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.कांबळे  

यांनी आपल्या कार्यकाळात  विद्यार्थ्यांना 

शिक्षणाचे उत्तम धडे देत गावातील अनेक विद्यार्थी यशाच्या शिखरावर नेऊन सोडले. एक शिस्तप्रिय प्रामाणिक शिक्षिका म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.यांची बदली झाल्याने त्यांना निरोप देताना विद्यार्थ्यांना गहिवरून आले. तर शिक्षक यांना देखील अश्रू अनावर झाले. 

कोकळगाव पूर्व शाळेतील दिपक कांबळे, विरेंद्र चामे,वंदना कांबळे  हे विद्यार्थी प्रिय शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांसोबत त्यांचा चांगलाच लळा होता. मागील दहा वर्षापासून ते कोकळगाव येथे कार्यरत होते. मात्र, नुकतीच त्यांची बदली झाली आहे. विद्यार्थी नेहमी प्रमाणे शाळेत आल्यानंतर त्यांना  मॅडमची बदली झाल्याची माहिती मिळाली. तेंव्हापासून आपल्या प्रिय  मॅडमना निरोप दिला जाणार, आपले आवडीचे शिक्षक शाळा सोडून जाणार, या भावनेने विद्यार्थी अस्वस्थ झाले. शिक्षक शाळेतून निघत असताना विद्यार्थी गहिवरले. हे पाहून शिक्षक   व विद्यार्थी पालकांनी देखील अश्रू रोखू शकले नाहीयत. हळव्या झालेल्या विद्यार्थ्यांना समजावत ग्रामस्थांनी अखेर  तिन्ही शिक्षकांना निरोप दिला. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला.या निरोप समारंभ प्रसंगी केंद्रप्रमुख रतन हांडे , सरपंच गुरलिंग वाकडे,निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे  संचालक अनिल कामले, किल्लारीचे प्रसिद्ध उद्योजक,शालेय व्यवस्थापन समिती, विद्यार्थी माता पालक,शिक्षकवृंद शाळेतील माजी विद्यार्थी व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments