Advertisement

कोकळगाव मदनसुरी नदी हत्तरगा, रस्त्याची दुरावस्था* रस्ता दुरुस्तीचा मुहूर्त कांहीं केल्या सापडेना ? अनेकांना शारीरिक मनक्यांचा होतोय त्रास

कोकळगाव मदनसुरी नदी हत्तरगा, रस्त्याची  दुरावस्था* 

रस्ता दुरुस्तीचा मुहूर्त कांहीं केल्या सापडेना ?

अनेकांना शारीरिक मनक्यांचा होतोय त्रास



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174 



लातूर : निलंगा तालुक्याच्या कोकळगाव नदी हत्तरगा मदनसुरी रस्त्यावर जागोजागी खड्यांचे साम्राज्य पसरले  असल्याने रहदारीसाठी रस्त्यावर वाहतूक करताना मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.पादचारी, दुचाकीस्वार फोर व्हीलर यांना या रस्त्याने ये- जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे. परिसरातील मदनसुरी कोकळगाव ते नदी हत्तरगा, किल्लारी मोड पर्यंत रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या जड वाहनांचे पाटे तुटणे, टायर पंक्चर होणे असे प्रकार वारंवार घडत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने खड्डे बुजवावेत, अशी मागणी  अनेक वर्षांपासून सातत्याने नागरिकाद्वारे करण्यात येत असून या ग्रामीण भागातील नागरिकांची ही मागणी ना आमदार ना खासदार लोकप्रतिनिधी यांना कधी कळणार अशा  स्थानिक नागरिक यांच्या चर्चेला उधाण आले आहे. मागील दोन वर्षाखाली थातुर मातुर अतिशय निकृष्ट दर्जाचे नदी हत्तरगा ते कोकळगाव रस्त्यांचे काम करण्यात आले होते, यामुळे  पुन्हा एकदा रस्त्याची दुरावस्था झाली आहे.

 रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत, रस्त्यावरील डांबर निघून गेले आहे. रस्त्यावरून ट्रॅक्टर खासगी वाहने, मोटार सायकल,भाजीपाल्याचे टेम्पो, आदी वाहतूक करणारे  यांची दिवसभरात ये-जा असते. परंतु खड्डे, चिखल , पाणी साचल्याने  टायर पंक्चर होणे, ट्रॅक्टर ट्रॉली उलटणे, मोटार सायकल स्लिप होणे अपघात होणे असे प्रकार वारंवार घडत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कोकळगाव ते नदी हत्तरगा, किल्लारी मोड  रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी स्थानिक नागरीकाद्वारे वारंवार केली जाते आहे.निलंगा तालुक्यातील  कोकळगाव, नदी हत्तरगा, मदनसुरी रस्ता अनेक वर्षापासून शेवटची घटका मोजत असल्याने या मार्गावरून ये जा करण्यासाठी कोणीही धजत नाहीत, रस्ता देता का हो कोणी रस्ता ?अशी आर्त हाक ऐकू येऊ लागली आहे.गावातून शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी तसेच स्थानिक ग्रामस्थ शेजारील गावात जातात शिवाय कोकळगाव येथे लातूर जिल्हा मध्यवृती बँकेचा व्यवहार परिसरातील चार पाच गावाचा असल्याने कोकळगावला नेहमीचीच वर्दळ असते, पण रस्त्या अभावी मदनसुरी कोकळगाव, नदी हत्तरगा या मार्गावर धावणारी वाहने  निकृष्ट रस्त्यामुळे  धजत नसल्याने  प्रवाशांची हाल होताना दिसत आहे.शिवाय या मार्गावरून दररोज ये-जा करणाऱ्या अनेक नागरिकांनाशारीरिक मणक्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे.व या मार्गावर बस सेवा उपलब्ध नसल्याने सामान्य नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.येथे शाळा , बँक असल्याने अनेक अबाल वृद्ध नागरिक ये-जा करीत असतात. तसेच येथे 

 या गावातील शेतकऱ्यांची किल्लारी बाजारपेठ असल्याने या मार्गावरून नेहमी वर्दळ असते. तेरणा नदीच्या तीरावर असलेल्या बँरेजेस पासून नदी हत्तरगा जुने गाव पर्यंत सरकारी बाभळीच्या काटेरी कुंपण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांची रेलचेल दिसत नसल्याने अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे.त्यामुळे येथील रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अन्यथा आगामी काळात संबधित विभागांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments