दावणगावच्या दोन कन्यांचा घोड्यावरून मिरवणूक काढून ग्रामस्थांकडून भव्य सत्कार
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
उदगीर : दावण ता उदगीर लातूर जिल्ह्यातील छोट्याशा गावाने अभिमानाने डोके वर काढले आहे. दावणगावातील दोन तेजस्वी कन्यांनी आपल्या कर्तृत्वाने गावाचे नाव राज्यभर उज्ज्वल केले आहे.
कु. प्रणिती मदन भंडे हिने MPSC परीक्षेत राज्यात पाचवा क्रमांक मिळवत थेट विक्रीकर आयुक्त (क्लास-1 अधिकारी) म्हणून निवड मिळवली आहे. तर दुसरी कन्या डॉ. अक्षदा प्रकाश साखरे हिने M.D. मेडिसिन ही प्रतिष्ठित पदवी मिळवून गावातील पहिली डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे.
या दोन्ही कन्यांच्या यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी ग्रामस्थांनी अभूतपूर्व कार्यक्रमाचे आयोजन केले. दोन्हींची घोड्यावर बसवून गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. फुलांच्या वर्षावात आणि जयघोषात संपूर्ण गाव आनंदाने न्हाऊन निघाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सतीश भंडे होते. या प्रसंगी उपजिल्हाधिकारी श्री सुशांत शिंदे उदगीर यांच्या हस्ते दोन्ही यशस्वी कन्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा. डॉ. शिवाजी मुळे (माजी सभापती प. स. उदगीर), ज्ञानेश्वर पाटील (सरपंच), महेश फुले (शिवसेना), दत्ताजी भंडे, हरिदास भंडे, किरण पाटील (मु. जी. प.), ज्ञानोबा भंडे (कवी), नागोराव भंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या अभिनंदनाने वातावरण भारावून गेले होते. गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळ, युवक मंडळ यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
दावणगावच्या या दोन कन्यांनी “शिक्षणानेच गावाचे नशीब बदलू शकते” हा संदेश आपल्या कार्यातून दिला आहे. संपूर्ण गाव त्यांच्या यशावर अभिमान बाळगून आहे.



0 Comments