Advertisement

हंडरगुळी येथील विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे..! सी.सी.टी.व्ही नाहीत,तरीही शिक्षण विभाग कारवाई का करेना ?

 हंडरगुळी येथील विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे..!

सी.सी.टी.व्ही नाहीत,तरीही शिक्षण विभाग कारवाई का करेना ?




मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9420010756

 हंडरगुळी :  राज्यातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थीनींवर वाढत्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरातील पालक व विद्यार्थीनी सुरक्षेच्या बाबतीत आज पण दहशतीतच आहेत.

बदलापूर दुर्घटनेनंतर तर राज्यात तीव्र संताप पसरला होता.म्हणुन या शासनाने सर्वच शाळा,महाविद्यालय या ठिकाणी सखी-साविञी मंच स्थापन करणे तसेच कॅमेरे बसविणे बंधनकारक केले आहे. आणि याचे पालन न करणा-या संस्थेवर (शाळा, महाविद्याय) त्वरीत कारवाई करा. असे आदेश संबंधित तालुक्याच्या अधिका-यांना दिले आहेत.तरीही उदगीर तालुक्यातील हंडरगुळी या सर्वात मोठ्या गावातल्या बहूतांश शाळांमध्ये ना सी.सी. टी.व्ही. आहेत. ना सखी-साविञी मंच. आणि याची माहिती असूनही तालूका शिक्षणाधिकारी व केंद्र प्रमूख हे याकडे जाणुन-बुजून दुर्लक्ष करीत आहेत. शासनाचे आदेश असतानाही याकडे दुर्लक्ष करण्यामागे नक्कीच मोठे अर्थकारण असू शकते!असा संशय येतोय.येथील एका इंग्लिश स्कुल मधील चिमुकल्या लेकरावर कांही महिण्यापुर्वी नको तसा प्रकार घडला होता आणि या बद्दल पालक व उपसरपंच यांनी त्या इंग्लिश स्कुल चालकाला चांगलेच झापले होते.तेंव्हा इंग्लिश स्कुल चालकाने माफी मागीतल्याने तो मार खाण्यापासुन वाचला होता.तेंव्हा एखादी मोठी दुर्देवी घटना घडल्यावरच सं.अधिकारी महाशय कुंभकर्णी झोपेतून उठतील का ?

बदलापूर,लातुर सारख्या घटना राज्यात अधून-मधून घडत असल्याने सर्वञ पालक,विद्यार्थींंनी सुरक्षेच्या बाबतीत चिंतेत आहेत.आणि असे असताना ही हंडरगुळी या गावात असलेल्या खाजगी मराठी व इंग्रजी माध्यमाच्या ७ शाळांपैकी ३ वगळता बाकीच्या शाळेत एक ही कॅमेरा दिसत नाही. *पालकांच्या खिशांवर डल्ला मारुन स्व:ताचा गल्ला भरणा-या शाळांना संबंधित संबंधित शिक्षण अधिका-याचे शुभ आर्शिवाद असल्या शिवाय संस्थाचालक शासन आदेश पायदळी तुडवतच नाहीत.ही चर्चा शिक्षणप्रेमींमध्ये सुरु आहे.*

संस्थाचालक व शिक्षक ही मंडळी शाळा सुरु होण्यापुर्वी तुमचं लेकरु आमच्या संस्थेत घाला हो.असे म्हणत दारोदारी कटोरा घेऊन हिंडत होते.आणि आता तीच मंडळी शालेय विद्यार्थीनींच्या जीवनाशी खेळतात.! संस्थाचालकांसह शिक्षक मंडळींवर दाट विश्वास ठेवून हजारो पालकांनी जीव की प्राण असलेले त्यांचे लेकरं ज्या संस्थेत शिकायला पाठविले त्या संस्थेच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षे संदर्भात कसलीच सुविधा नाही.

मुलींच्या सुरक्षेसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या वागणुकीवर वाॅच राहावे म्हणुन,व शाळेच्या आवारात लोफर मंडळी येऊ नये.म्हणुन कॅमेरे आवश्यक आहेत.तरीही येथील शाळेत कॅमेरे दिसत नाहीत.आणि याची माहिती असून व देऊनही संबंधित शिक्षण अधिकारी व केंद्र प्रमूख हे महाशय कारवाई करत नाहीत.याचेच शिक्षण प्रेमींना व पालकांना नवल वाटते.

CCC.TV कॅमेरे नसलेल्या शाळा व महाविद्यालयावर कारवाईचे धाडस संबंधित अधिकारी महाशयाने आज पर्यंत दाखविले नाही.हे विशेष..!!

म्हणुनच या गावात व परिसरातील अनेक शाळां मध्ये कॅमेरे नाहीत.

प्रत्येक खाजगी अनुदानित तसेच विना अनुदानित शाळांमध्ये कॅमेरे बसविण्यात यावेत.तसेच न बसविले तर कारवाई करावेत.असे शासनाचे सक्त आदेश आहेत.व याचा शासन जीआर कधीचाच निघाला आहे.तरीही या आदेशाला तालुका प.सं.शिक्षण अधिकारी व केंद्र प्रमूख यांनीच पायदळी तुडविल्याने हंडरगुळीच्या शाळेत कॅमेरे व स्कूल बस दिसेनात..

 तेंव्हा जिल्हा परिषद सी.ई.ओ आणि जिल्हा शिक्षणाधिकारी यांनीच लक्ष घालावे.आणि विद्यार्थीनींचे रक्षण करावे. अशी माफक अपेक्षा पालक व शिक्षण प्रेमींमधून व्यक्त केली जाते.

संबंधित अधिकारी थंडच आहेत. तसेच कोणताच अधिकारी माझे वाकडे करु शकत नसल्याने मी आजवर मान्यताप्राप्त स्कुल बस घेतलो नाही. आणि घेणारही नाही.अशी मगरुरीची (देशमुखी) भाषा खाजगी मध्ये बोलताना एका इंग्लिश स्कूलच्या चालकाने अनेकदा वापरली आहे

Post a Comment

0 Comments