वाढवणा पोलिसांची श्रीदेवी च्या अड्ड्यावर धाड;तीघांवर कारवाई
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
हंडरगुळी : वरिष्ठांच्या आदेशानुसार अवैध धंदे करणा-यांविरुध्द वाढवणा पोलिस अलर्ट झाले असुन त्यांना मिळालेली माहिती नुसार हाळी येथील नागनाथ बच्चेवार यांचे घरासमोर आरोपी ज्ञानेश्वर भगवान बच्चेवार हा स्वत:चे फायद्यासाठी "श्रीदेवी" नामक मटका जुगार खेळत व खेळवित असताना रोख १३५०₹ व जुगारा-या साहित्या सह मिळून आला असून त्याच्यावर दत्ताञय वाडकर(पो.ह)यांनी फिर्याद दिल्याने गुरनं.३०५/२५ कलम १३अ नुसार गुन्हा नोंद झाला.शिवप्रताप रंगवाळ याचा पुढील तपास करतात.तर दुस-या एका गुन्ह्यात वसंत बच्चेवार हे श्रीदेवी नावाचा मटका जुगार खेळत व खेळवित असताना रोख १४०० व जुगार साहित्यासह मिळून आल्याने त्याविरुध्द सपोनी.सुनील गायकवाड यांनी तक्रार दिल्याने आरोपीविरुध्द मुंजुका नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून,याचा पुढील तपास पोहेकाॅ.रंगवाळ करत आहेत.तसेच राज्यमार्गालगत असलेल्या साई मोबाईल शेजारी महेबुब मैनोदीन सय्यद,हंडरगुळी हा स्वत:च्या फायद्यासाठी कल्याण नावाचा मटका जुगार लोकांकडून पैसे घेऊन खेळत व खेळवित असल्याची खबर लागताच रोख १०५० ₹ व जुगाराच्या साहित्यासह आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले.या आरोपीविरुध्द पोहेकाॅ.रंगवाळ यांनी फिर्याद दिल्याने आरोपी विरुध्द मुंजुका अन्वये गुन्हा नोंद केला असून पुढील तपास एस.पी.दळवे (हे.काॅ) हे करत आहेत.अशा प्रकारे श्रीदेवी नामक मटका जुगारावर वाढवणा पोलीसांनी धाडी टाकल्यामुळे हाळी हंडरगुळीत खळबळ उडाली आहे.
.jpg)

0 Comments