Advertisement

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढावा यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा सच्चा साथी हरपला

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढावा यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा सच्चा साथी हरपला

कष्टकऱ्यांचा बुलंद आवाज बाबा आढाव यांच्या निधनाने सामाजिक समतेचा दीपस्तंभ हरपला ~ केंद्रीय  राज्यमंत्री रामदास आठवले




मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


मुंबई :  हमाल पंचायत स्थापन करून कष्टकऱ्यांचा आवाज बुलंद करणारे नेते बाबा आढाव यांच्या निधनाने शोषित ; श्रमिक ; गरीब;  बहुजनांचा आधारवड ; एक गाव एक पाणवठा चळवळ उभारणारे सामाजिक समतेचा दीपस्तंभ हरपला आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिवंगत बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

दिवंगत  ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्याशी आपले अत्यंत घनिष्ठ आपुलकीचे संबंध होते.ज्येष्ठ समाजसेवक कृतिशील विचारवंत कामगार कष्टकऱ्यांचे लढाऊ नेते म्हणून बाबा आढाव यांचे योगदान अतुलनीय आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता. नामांतर आंदोलनाला पाठिंबा देणारे ते कृतिशील विचारवंत होते.समाजवादी विचारसरणी सोबत त्यांनी नेहमीच आंबेडकरी चळवळीला साथ दिली आहे. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा सच्चा साथी हरपला आहे अशी शोकभावना ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

नामांतर आंदोलन; कामगारांचा न्याय हक्कासाठी चे आंदोलन अनेक आंदोलनात बाबा आढाव अग्रेसर होते. जेव्हा पुण्यात जायचो तेव्हा बाबा आढाव यांची नेहमी भेट व्हायची.अलीकडे त्यांच्या प्रकृतीचा चौकशीसाठी मी त्यांच्या निवासस्थानी सुद्धा दोन वेळा भेट घेतली होती.त्या भेटीत बाबा आढाव यांनी मला पुण्यातील रेल्वे स्टेशन येथील मालधक्का हलवला जात आहे.तिथे मालगाड्यांचा थांबा;येथील हमालांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी माझ्याशी चर्चा केली होती.आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत बाबा आढाव यांनी गोरगरिब कष्टकरी  कामगारांचे प्रश्न सोडविण्याबाबत ते समर्पित होते.बाबा आढाव यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची कधीही भरून येणार नाही अशी हानी झाली आहे.अशी शोकभावना ना. रामदास आठवले यांनी पाठवलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.


Post a Comment

0 Comments