तांबाळा येथे पोषण महा समारोप उत्साहात साजरा
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा: निलंगा तालुक्यातील कासार सिरसी, कासार बालकुंदा, बोरसुरी बीट अंतर्गत तांबाळा येथे पोषण अभियानांतर्गत आय सी डी एस पोषण माह समारोप मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तांबाळा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पोषण अभियानावर रांगोळ्या व आहार बनविण्यात आला होता. यावेळी १,००० दिवस बाळाचे, सदृढ बालक लसीकरण, आहार, लेक लाडकी योजना, अन्नसेवन, पालेभाज्यांचे सेवन, हात धुणे, बाळासाठी आई जगलीच पाहिजे, अशा विविध विषयांवर मान्यवरांनी व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मार्गदर्शन केले. तसेच, स्त्री अत्याचारावर पथनाट्य सादर केले. कलाकृतींतून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकण्यात आले.या वेळी जिल्हा कार्यकारी अधिकारी जावेद शेख,अध्यक्ष प्रमुख अतिथी गटविकास अधिकारी सोपान अकेले, बालविकास प्रकल्प अधिकारी कोरे सर, विस्तार अधिकारी जगताप सर, सुवर्णकार सर, बोंबले सर,विविध विभागांतील पर्यवेक्षिका, सरपंच, शालेय मुख्याध्यापक,अंगणवाडी सेविका, मदतनीस, स्तनदा माता, विद्यार्थिनी आशा कार्यकर्त्या व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments