Advertisement

कासार शिरसीत स्मशानभूमीची दुरावस्था परिसर अत्याधुनिक करण्याची नागरिकांची मागणी

 कासार शिरसीत स्मशानभूमीची दुरावस्था 

 परिसर अत्याधुनिक करण्याची नागरिकांची मागणी




मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9420010756


कासार सिरसी: कासार शिरसी शहरातील स्मशानभूमीची अत्यंत 

 दैनिक अवस्था झाली आहे आहे ती जागा  अंत्यविधीस

 अपुरी पडत असून या बाजूची जमीन संपादित करून या मार्गावरच्या ओढ्याच्या पुलाचे काम व या ठिकाणी प्रकाशासाठी विजेची सोय करीत ही स्मशानभूमी अत्याधुनिक  करावी अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे 

 कासार शिरसी शहरा नजीक असलेल्या सार्वजनिक स्मशानभूमीची अनेक वर्षापासून दुरावस्था झाली असून बांधकाम करण्यात आलेले शेड जीर्ण झाले असून याची पडझड चालू आहे तर या ठिकाणचे लोखंडी शेड सुद्धा गायब झाले आहे हा परिसर झाडा झुडपाने  व्यापला असून रस्त्या अभावी येथे पोहोचणे अवघड बनले आहे याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे 

 स्मशानभूमीच्या संरक्षण कठडयासह सर्व साधनसोयीसाठी शासनाकडून भरपूर निधी येतो हा निधी जातो कोठे असा संतप्त सवाल नागरिकांतून करण्यात येत आहे या परिसरातील अतिक्रमणे हटवावी अशी मागणी करण्यात येत आहे स्मशानभूमी ही जीवनातील अंतिम सत्य आहे ते सत्य मंदिर करावे यासाठी सर्वांनी आपल्या मृत नातेवाईकांच्या स्मृती प्रित्यर्थ या ठिकाणी एक सिमेंटी बाक भेट देत एक पेड मा के नाम या अभियानांतर्गत प्रत्येकाने या परिसरात वृक्षारोपण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments