हाडोळी येथे चंपाषष्ठी निमित्त खंडोबा बानाईचा विवाह सोहळा थाटात संपन्न
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा : निलंगा तालुक्यातील हाडोळी येथील खंडोबा मंदिरात सायंकाळी सात वाजता देव खंडोबा व देवी बानाई चा विवाह मंदिरात विधिवत पूजा करून मोठ्या थाटात संपन्न झाला.
खंडोबा महाराजांच्या विवाह सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हळद फोडणे, जात्यावर हळद दळण्याचा कार्यक्रम दुपारी मंदिराच्या प्रांगणात पार पडला.
यावेळी सदगुरू स्वामी बळीनाथ बाबा मठाचे मठाधिपती प.पु.गु.आचार्य महंत कृष्णानंद पुरीजी महाराज व राघवेंद्र जोशी महाराज व गावातील भक्तगणांची उपस्थिती होती.



0 Comments