साड्या करणार पिकांचे रक्षण
वन्यप्राण्यांमुळे हाळी-हंडरगुळीचे शेतकरी हैराण
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9420010756
हंडरगुळी : सालाचे बारा महीने कितीही आणि कसलेही संकटे आले तरी मोठ्या धैर्य्याने,धाडसाने त्या संकटाचा जीव तोडून सामना करणारा प्राणी म्हणजे शेतकरी
पण..सध्या शेतक-यांच्या अंगातुन धैर्य्य,धाडस गळून पडले आहे. कारण,हातातोंडाशी आलेला खरीब हंगाम निर्सगाने हिरावून नेला.आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले.तरी पण मोठ्या धाडसाने रब्बीची पेरणी केली आणि पीकेही चांगली उगवली परंतू,सायाळ नामक वन्य प्राणी ही पीके विशेषत: भुईमुग उध्वस्त करत असल्याने हैराण झालेले शेतकरी बांधव पिकांचे रक्षण करण्यासाठी ४ ही बाजुने वेस्टेज साड्यांचे कुंपन केल्याचे चिञ दिसून येते.
एकंदरीत वन्य हिंस्ञ प्राण्यांमुळे या परिसरातील शेतकरी हैराण झालाय.
ऊसतोड चालू असल्याने सध्या रान डुकरं कमी झाले आहेत.माञ,हाळी व परिसरात सायाळ नामक वन्य प्राण्याने पिकांमध्ये विशेष करुन शेंग उध्वस्त करत आहेत.दिवसा जागल जमते.पण थंडीत राञी जागल कशी करणार?तेंव्हा शासनाने पिकांच्या रक्षणासाठी नेट किंवा अन्य साहित्य द्यावेत.सध्या शेंगाच्या अवती भोवती वेस्टेज साड्यांचे कुंपन केलो आहे.
फारुख महेमुदसाब शेख
शेतकरी,हाळी-हंडरगुळी...
पिकांच्या रक्षणासाठी नेट मिळणार, अशा बातम्या,व्हिडीओ विविध अशा सोशलमिडीयावर फिरत आहेत.माञ प्रत्यक्षात शासनाची अशी कुठलीही योजना नाही.भविष्यात अशी स्कीम आली तर नक्कीच गरजू शेतकरी बांधवांना लाभ मिळवून देऊ.
विनोद धुळे,ग्राम क्रषी अधिकारी
हाळी ता.उदगीर


0 Comments