औराद शहाजानी येथील बाजार समितीच्या वतीने सोयाबीन खरेदी केंद्र सुरु
महिला शेतकऱ्याच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
औराद शहाजानी : येथील बाजार समितीच्या वतीने पहिल्यांदाच विद्यमान आमदार तथा माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुढाकाराने खरेदी केंद्र सुरु करण्याचे जाहीर केल्याप्रमाणे आज प्रत्यक्षात खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. आणि या खरेदी केंद्राची सुरुवात ही बाजार समितीच्या सभापती यांनी ऐन वेळी आज उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांपैकी महिला शेतकरी यांच्या हस्ते पुजा करुन शुभारंभ करण्यात आला.
आज बाजारात समितीच्या वतीने उपस्थित शेतकरी वैशाली बाबासाहेब जाधव रा. गुराळ , ता. निलंगा जि. लातूर येथील शेतकरी महिला यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी आज पहिलाच दिवस असल्याने थोडीफार शेतकऱ्यांच्या गर्दी कमी होती पण उद्यापासून खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तेथेच बाजार समितीच्या वतीने चहा व नाष्ट्याची सोय करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांनी स्वतःहुन आपल्या धान्याची व्यवस्थित काळजी घेऊन चांगले स्वच्छ करुन शेतकऱ्यांना मेसेज आल्याप्रमाणे गर्दी न करता खरेदी केंद्रावर सोयाबीन घेऊन यावे असे आवाहन करण्यात आले.
यावेळी बाजार समितीचे सभापती नरसिंग बिरादार , सचिव सतिश मरगणे , सन्माननीय संचालक सुरेश बिरादार, कालिदास रेड्डी, सतीश देवणे, सौ अर्चना गोंडगावे, वाघजी पाटील, डॉक्टर शंकद वीरपाक्षेश्वर, अनिल भंडारे, महेंद्र गिरी, सुधाकर शेटगार, शिवपुत्र आगरे, भगवानदास लड्डा, चंद्रकांत पिचारे व आणि कर्मचारी मेसेज पाठविण्यात आलेले शेतकरी व गावातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.



0 Comments