Hot Posts

6/recent/ticker-posts

स्वर्गीय आईवडिल व पत्नीच्या स्मरणार्थ स्मार्ट एल ई डी टिव्ही भेट - विजयकुमार लड्डा यांचे सामाजिक कार्य

 स्वर्गीय आईवडिल व पत्नीच्या  स्मरणार्थ स्मार्ट एल ई डी टिव्ही भेट - विजयकुमार  लड्डा यांचे  सामाजिक कार्य 



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174



निलंगा : सुसंस्कराचं शिक्षण देणारे आई वडील जग सोडून गेले. त्यांची आठवण कायम स्मरणात रहावी, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, ही भावना जपत  निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील रहिवासी असलेले पण सध्या सांगली येथे वास्तव्यास असलेले विजयकुमार लड्डा  यांनी त्यांचे जन्मगाव असलेल्या कोकळगाव येथील द्रोणाचार्य क्लासेसला विद्यार्थ्यांनाआधुनिक काळात शिक्षणप्रणालीचा विचार करून एल.ई. डी स्मार्ट टीव्ही उपलब्ध करून दिला आहे.



 विजयकुमार लड्डा  हे सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून आई वडिल आणि पत्नीच्या  स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी गरजू व गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मदत व्हावी या उद्देशाने कार्य करीत असतात. कोकळगाव येथील रहिवासी तसेच सध्या सांगली येथे नोकरीच्या निमित्ताने स्थिरावलेले 

लड्डा  कुटुंबीय यांची सामाजिक कार्याबद्दल खूपच आस्था असल्याने ते नेहमी सामाजिक कार्य करीत असतात.

गावातील गरजू व गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी एल ई डी स्मार्ट टीव्ही उपलब्ध करून देणेसाठी द्रोणाचार्य क्लासेसचे संचालक प्रा.कोळी यांनी त्यांना विनंती केली असता विजयकुमार लड्डा यांनी त्यांच्या शब्दाला जागत  

स्व. किशनलालजी स्व.अयोध्याबाई व स्व. सौ मंदाकिनी यांचे स्मरणार्थ, विजयकुमार लड्डा कुटुंबीयांकडून, द्रोणाचार्य क्लासेसला 

 स्मार्ट टीव्ही भेट दिला.याप्रसंगी क्लासेसचे संचालक द्रोणाचार्य कोळी व विद्यार्थ्यांनी लड्डा कुटुंबियांच्या प्रती आदर व्यक्त करत आभार मानले.

Post a Comment

0 Comments