आय टी इंजिनिअरिंग क्षेत्रातील वैष्णवी लड्डा ने पटकावले सिल्वर मेडल
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
लातूर : निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील विजयकुमार लड्डा यांची नात व लक्ष्मीकांत विजय लड्डा यांची कन्या या कुटुंबातील मुलीने शहरी विद्यार्थ्यांपेक्षा चांगली कामगिरी करून, आय टी इंजिनिअरिंग क्षेत्रात आपले नाव कोरले. यामुळे कोकळगाव सह ग्रामीण स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आय टी क्षेत्रात केलेली कामगिरी शिक्षक वर्गासाठी अभिमानाची बाब आहे.
वैष्णवी ला लहानपणापासून इंजिनिअरिंग क्षेत्रातील करियरची आवड आहे म्हणून तिला या क्षेत्रात करिअर करण्याची परवानगी दिली. वैष्णवीने आय टी इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात कॉलेज मध्ये दुसरा क्रमांक मिळवून आज ग्रामीण भागात नाव झळकावून सिल्व्हर पदक मिळवले.व वैष्णवी सध्या इस्रायलच्या नॉइस कंपनी मध्ये जॉब करत आहे. तिच्या या यशाबद्दल कोकळगाव सह परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जातो आहे.
0 Comments