Hot Posts

6/recent/ticker-posts

कोकळगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिवराज्यभिषेक दिनानिमित्त शिव स्वराज्य दिन उत्साहात साजरा

 कोकळगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिवराज्यभिषेक दिनानिमित्त शिव स्वराज्य दिन उत्साहात साजरा 



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


निलंगा :  तालुक्यातील कोकळगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शासनाने दिलेल्या नियमांच्या अधीन राहून शिव स्वराज्य दिन साजरा करण्यात आला.

 शिवराजभगवा स्वराज्य ध्वज आणि शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.  

 यावेळी सरपंच गुरलिंग वाकडे, ग्रामविकास अधिकारी धनंजय ढवण, उपसरपंच सतीश माने, ग्रामसेवक दिगंबर जाधव,तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र वागन्ना, वीरभद्र वाकडे, ओमकार बिराजदार, दिलीप कारभारी कामले वाडी,

कालिदास लामतूरे, जगन्नाथ आगलावे, शंभुलिंग स्वामी, बालाजी कामलें,आरोग्य कर्मचारी राहुल भोसले, दिनकर बनसोडे, दत्तात्रय बनसोडे, अनिल पाटील,अंगणवाडी कर्मचारी आशा वर्कर,ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील नागरिक आदींची उपस्थिती होती.

 कार्यक्रमप्रसंगी ग्रामविकास अधिकारी धनंजय ढवण यांनी शिव स्वराज दिना विषयी विचार मांडले.

Post a Comment

0 Comments