मसलगा पाटी ते आंबेगाव मोड पर्यंत चे अतिक्रमण काढा
ग्रामपंचायत सह गावकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा : निलंगा तालुक्यातील मसलगा पाटी ते आंबेगाव मोड पर्यंत शेतकऱ्यांनी दोन्ही बाजूने अतिक्रमण करून रस्ता अतिशय लहान केलेला असुन रस्त्यावरील अतिक्रमण काढावे यासाठी ग्रामपंचायत सह गावकऱ्यांच्या सह्याचे निवेदन दि. ३ जून २०२५ रोजी निलंग्याचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांना छावाचे तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके व माजी सरपंच ज्ञानेश्वर पिंड यांनी दिले आहे.
या रस्त्यावर विशेषता मारोती मंदिर ते निटूर पाणंद रस्ता ३३ फुटाचा असुन आज एक वाहन जाणे अवघड झाले आहे. सध्या मसलगा पाटी ते आंबेगाव गावापर्यंत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्याचे काम चालू असुन अतिक्रमण काढल्यावर रस्ता मोठा होणार आहे. अतिक्रमण नाही काढल्यास दि. ११ जून २०२५ रोजी ग्रामपंचायत मसलगासह ग्रामस्थ व अखिल भारतीय छावा संघटना निलंगा तालुक्याचे वतीने तहसील कार्यालय निलंगा येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. निवेदनावर सरपंच, ग्रामसेवक आदीसह गावातील १०० नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 Comments