विजकुमार लड्डा यांच्या वतीने सांगली आगारातील चालक व कंडाक्टर यांना गाद्या व मच्छरदाणी भेट
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
सांगली : समाजसेवेची आस असणारी कांहीं व्यक्ती आपण समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, आपण समाजाचे कांहीतरी देणे लागतो अशा उदात्त हेतूने प्रेरित कार्य करीत असतात.निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील रहिवासी असलेले सद्या सांगली येथे वास्तव्यास असलेल्या विजयकुमार लड्डा यांनी समाजातील अनेक गरजूंना मदत केली आहे.थंडीमुळे चालक आणि कंडाक्टर यांना थंडीमध्ये आराम मिळावा म्हणून सांगली आगारातील लालपरीच्या चालक आणि कंडाक्टर यांना 20 गाद्या व मच्छरदाणी भेट दिली आहे. थंडीमध्ये वाहन चालवताना अनेक समस्या येतात, जसे की थंड वारे, डास चावणे यामुळे चालक आणि कंडक्टर यांना अशा समस्यांना सामोरे जावे लागते म्हणून विजयकुमार लड्डा यांनी चालक कंडक्टर यांना अशा स्वरूपाची भेट दिली असल्यामुळे आगारातील चालक आणि कंडक्टर यांनी त्यांचे आभार मानले आहेत.



0 Comments