Advertisement

माजी उप सभापती ज्ञानेश्वर वाकडे यांच्या मुलांच्या विवाह सोहळ्यास आमदार अभिमन्यू पवार यांची उपस्थिती

 माजी उप सभापती ज्ञानेश्वर वाकडे यांच्या मुलांच्या विवाह सोहळ्यास आमदार अभिमन्यू पवार यांची उपस्थिती


 मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174

निलंगा : निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील आमदार अभिमन्यू पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी सन्माननीय ज्ञानेश्वर वाकडे यांच्या मुलांच्या विवाह शुक्रवार दिनांक 07 नोव्हेंबर रोजी पार पडला. या विवाह सोहळ्याला आमदार अभिमन्यू पवार  यांनी आवर्जून उपस्थित राहून या कुटुंबाप्रती जिव्हाळा व्यक्त केला. आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून त्यांनी या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून आशीर्वाद दिले. 

सर्व कामकाज बाजूला ठेवून या विवाहाला उपस्थित राहिल्याने त्यांच्यातील स्नेहबंध स्पष्ट झाल्याचे म्हटले. यावेळी कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, शिंदे गट शिवसेना लातूर जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने,ऍडव्होकेट परिक्षीत पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातूरे, सुहास पाचपुत्ते, शेखर नाना सोनवणे, अनंत गायकवाड,संतोष अप्पा मुक्तार, सुभाष जाधव, कासार सिरसी मंडळ अध्यक्ष नाना धुमाळ, ज्ञानेश्वर बरमदे, अमोल अप्पा आर्य , जिलानी बागवान आदींची उपस्थिती होती.सन्माननीय विद्यमान आमदार अभिमन्यू पवार व विशेष आमंत्रित मान्यवर यांचे वधू-वर पक्षांनीही विशेष आभार मानले.

Post a Comment

0 Comments