तिरु नदीकाठची गावे गारठली, हुडहूडी जाईना
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील हाळीहंडरगुळी सह परिसरातील अनेक गावे रक्त गोठवणा-या थंडीने गारठली असून स.१० वाजलेतरीही अंगातली हुड हुडी कांही जाईना.
हाळी,हंडरगुळी,मोरतळवाडी,सुकनी चिमाचीवाडी,वंजरवाडी सह आजु बाजुचा परिसर तिरु मध्यम प्रकल्पा लगत येतो.आणि या प्रकल्पासह लहान,मोठे तलाव,नद्या यंदा तुडूंब भरल्या आहेत.यामुळे हा परिसर ४ दिवसापासुन गारठला असून स.१० वाजलेतरीही थंडी जात नसल्यामुळे अनेकजण विशेषत: नवजात बालके वयस्कर मंडळी,गरोदर माता हैराण झाले असून सकाळी व राञी ७नंतर घराबाहेर पडणे टाळत असल्यामुळे मार्केट मध्ये अघोषित कर्फ्यू लागली की काय?असा सवाल यामुळे निर्माण झाला आहे.हंडरगुळी व परिसर हा तिरु नदी व प्रकल्पालगत असल्याने नदीकाठच्या गावांना थंडी बाहेर फिरु देत नाही.सध्या रक्त गोठवणा-या थंडीने उग्ररुप धारण केले असल्याने अनेकजण अंगातुन स्वेटर,मफलर,जॅकेट,हात,पायमोजे काढत नसल्याचे दिसते.येत्या कांही दिवसात माळेगाव जि.नांदेड येथील याञा असल्याने थंडी आणखी जोर धरु शकते.असे जाणकार म्लणतात. तर नागरिकांनी स्वत:सह गुराढोरांची पण काळजी घ्यावी.असे वैद्यकिय तज्ञांचे म्हणणे आहे.
एकंदरीत तिरु नदीकाठची अनेक गावे वाढत्या थंडीने गारठली असून यातुन सुटका करण्यासाठी शेकोट्या चहा,कडक ऊन यासारख्यांचा वापर अनेकजण करुन घेताना दिसतात.


0 Comments