ना डीजे, ना बँड, टाळ मृदुंगाचा गजर अन् नवरदेवाचा अनोखा विवाह सोहळा ; वऱ्हाडी रंगले भक्तीच्या रंगात
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा : लग्न म्हटलं तर धांगडधिंगा हा आलाच. डीजे, बँड नसेल तर ते लग्न कसले. आजच्या काळातील लग्न डीजे आणि बँडशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. डीजेच्या तालावर नृत्य करत नाचणारी तरुणाई लग्नाचा माहौल तयार करतात. लग्नाच्या या समारंभात मग घरची वयोवृद्ध मंडळीही तालधरत लग्नसोहळ्यात मज्जा आणतात. पण निलंगा तालुक्यातील जाजनुर येथील बालाजी मारुती गुराळे यांचे चिरंजीव कृष्णा गुराळे व सिंदी जवळगा येथील नारायण चंद्रभान शिरसल्ले यांची कन्या वैष्णवी शिरसल्ले या नवं दांपत्याचा विवाह सोहळा एका अनोख्या पद्धतीने पार पडला.या लग्नात ना बँड होता ना डीजे. फक्त टाळ आणि मृदुंग वाजवत विवाह सोहळा संपन्न झाला. नवरदेवाच्या हातात मृदंग व वधूच्या हातातील टाळेचा ठेका पाहून सर्वांनाच कुतुहूल वाटलं.
अलिकडच्या काळात लग्न म्हटलं की लाखो रूपयांचे बॅन्ड, हजारोंचे डीजे याची क्रेज वाढत असताना त्याला अपवाद ठरावा असा लग्न सोहळा निलंगा येथील सुयोग मंगल कार्यालयात पार पडला. डीजे नाही, बॅन्ड नाही, तर चक्क वारकरी संप्रदायाचा वारसा जपत टाळ मृदंगाच्या गजरात,
हरिनामाच्या मनमोहक आनंदात, ज्येष्ठ वारकरी आणि नागरिकांच्या भक्तीमय वातावरणात वधुवरास शुभाशीर्वाद देण्यात आला. हा अनोखा प्रयोग सामाजात एक आदर्श निर्माण करणारा ठरत आहे. डीजेमुळे समाजात एकीकडे चिंता तर दुसरीकडे निर्धास्तपणा अशा परिस्थितीत समाजासमोर एक मोठा प्रश्न निर्माण होत असताना, त्या प्रश्नावर तोडगा ठरावा असा आगळावेगळा लग्न सोहळा शुक्रवार दिनांक ०७ नोव्हेंबर रोजी निलंगा येथे पार पडला.
डीजे आणि बँडच्या अवाढव्य खर्चाला या लग्नात फाटा देण्यात आला. डीजे आणि बँडवर नाचल्यानंतर दारूचे घोट घशात ओतण्याच्या प्रकारालाही या लग्नात आळा घालण्यात आला. अनोखा आदर्श दोन्ही कुटुंबीयांच्या वतीने समाजासमोर ठेवला आहे. यावेळी गुरुवर्य किर्तनकार ह. भ. प. परमेश्वर हाडोळीकर,गहिनीनाथ महाराज औसेकर सच्चिदानंद महाराज वाक्सेकर, दिपक महाराज, प्रशांत महाराज बलसूरकर, सदानंद लखने महाराज, सुभाष महाराज आष्टेकर, ज्ञानेश्वर महाराज काटेजवळगा,नितीन महाराज कवळी हिपरगा , प्रा. गोदरे गुरुजी औराद,पुंडलिक टेकले, संगीत विशारद ज्ञानेश्वर गुरूजी हाडोळीकर, सहशिक्षक प्रदीप मुरमे,आदी मान्यवरांची उपस्थिती होती.



0 Comments