साहेब...भूकंपग्रस्त भागातून रेल्वे येऊ दया
किल्लारी ग्रामपंचायतचे मंत्री नितीन गडकरी यांना साकडे
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
किल्लारी : भूकंपग्रस्त किल्लारी ( ता. औसा, जि. लातूर ) हे लातूर-औसा -किल्लारी - उमरगा -आळंद कलबुर्गी या मुख्य राष्ट्रीय मार्गावर स्थित आहे. या भूकंपग्रस्त भागांच्या सर्वांगीण विकासासाठी किल्लारी गाव व पाटी परिसरात उड्डाणपूल, शाळेच्या ठिकाणी भुयारी मार्ग, पाच किलोमीटर अंतरामध्ये गाव विस्तार झाला असून रिंग रोड उभारणी. नवीन एम.आय.डी.सी. व रेल्वे मार्ग उभारणीस रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून आवश्यक सहकार्य करावे असे किल्लारी ग्रामपंचायत च्या वतीने सोमवारी ( ता. १० ) रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन साकडे घालण्यात आले आहे.
यात म्हटले आहे की किल्लारी या भूकंप ग्रस्त परिसरात नवीन (एम.आय.डी.सी.) स्थापन करण्यात यावी. येथे समतल जमीन, मुबलक मनुष्यबळ व वाहतुकीस सोयीस्कर लातूर- औसा - किल्लारी नारंगवाडी- जेकेकूर एम. आय. डि. सी. (उमरगा) - आळंद मागें कलबुर्गी राष्ट्रीय महामार्ग आहे.
या मार्गांवर अनेक साखर कारखाने, मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या, मोठे देवस्थाने, मालवाहतूक, मालावर प्रक्रिया उद्योग, सोयाबीन उद्योग, औसा एमआयडीसी, जेकेकूर एमआयडीसी, किल्लारी, बेलकुंड व भाऊसाहेब साखर कारखाने, तीर्थ क्षेत्र देवस्थान किल्लारी, तीर्थक्षेत्रे औसा, किल्लारी कृषी उत्पन्न बाजार समित्ती, अंबाबाई तुळजापूर मोड, नाथ संस्थान औसा, शेकडो फळबाग प्रक्रिया उद्योग, द्राक्ष उत्पादक शेतकरीसह छोटे मोठे अनेक भूकंपग्रस्त उद्योजक आहेत. औद्योगिक क्षेत्रामुळे भूकंपग्रस्त युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. स्थानिक आर्थिक विकासास चालना मिळणार आहे.
यासोबततच लातूर कलबुर्गी नवीन सरळ रेल्वे मार्गाचा सर्वे झाला असून या सरळ मार्ग उभारणीस गती द्यावी. हा मार्ग लातूर- औसा - किल्लारी नारंगवाडी- जेकेकूर एम. आय. डि. सी. (उमरगा) - आळंद मागें कलबुर्गी असा १४८ किलो मीटरचा सरळ रेल्वे मार्ग होईल. या मार्गासाठी मंजुरी मिळावे यासाठी आपण रेल्वेमंत्री व संबंधित विभागाशी शिफारस करावी.
औसा ते उमरगा या राष्ट्रीय महामार्गाला समांतर व वाहतुकीसाठी बंद असलेला अंदाजे ७० किलोमीटरचा जो कि जुन्या किल्लारी गावातून जातो. असा जुना औसा उमरगा रोड आहे. हा रोड नवीन रेल्वे मार्गासाठी वापरल्यास जमीन भूसंपादनासाठी लागणारे अनेक हजार कोटी रुपयेची बचत होईल. म्हणजेच शासनाचा निधी व सरळ मार्ग जात असल्याने प्रवाशांचा वेळ आणि आर्थिक बचत होईल.
यासाठी पंधरा वर्षांपासून माजी आमदार, खासदार यांनी रेल्वे सरळ मार्गे जावे म्हणून पाठपुरावा केला होता. यासाठी आपण विशेष लक्ष देऊन या सरळ मार्गास मंजुरी मिळण्यासाठी शिफारस करावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
प



0 Comments