मदनसुरी, कोकळगाव कासार सिरसी
परिसरात अवैध धंदे जोमात, अनेकांच्या संसाराची होतेय होळी अन् पोल
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9420010756
लातूर : निलंगा तालुक्यातील मदनसुरी, कोकळगाव, रामलिंग मुदगड, अंबुलगा वि. सरवडी कासार सिरसी येथे अवैध धंदे बहरले असून, ग्रामीण भागातील तरुण पिढी मात्र व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःचे संसार उद्ध्वस्त होत असतानाचे चित्र पाहावयास मिळते आहे.
'मटका व्यवसाय जोमात सुरु असून मटक्याच्या अधीन
गेलेल्या तरुणांचे संसार कोमात गेल्याचे विदारक चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. मटका जुगार गुटखा,
अवैध दारूची दुकाने बार यांचा अक्षरश: बाजार
मांडलेला असून, सदर अवैध धंदे राजरोजसपणे, बिनधास्त कोणालाही न जुमानता चालतात म्हणजे यांना कोणाचे पाठबळ आहे ?
कोणाच्या छत्र छायेखाली हे काळे धंदे चालतात? असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत आहे. मदनसुरी, कोकळगाव सरवडी,कासार सिरसी गावात अवैध व्यावसायाने जोर धरला असून, चौका-चौकात खुलेआम गुटखा आणि मटक्याचा बाजार सुरु आहे. पोलिसांबरोबर अवैध व्यावसायिकांचे जाळे किती घट्ट जुळलेले आहे याचा प्रत्यय येथे येतो. या
व्यावसायातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असून, पोलिसांकडून कुठलीच कारवाई होत
नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. मदनसुरी, कोकळगाव कासार सिरसी गावात हात मजुरांची संख्या
मोठ्या प्रमाणात आहे. त्यात तरुणांचीच संख्या जास्त आहे.
मात्र बहुतेक तरुण मटक्याच्या आहारी जाऊन,झटपट पैसे कमावण्याच्या नादात या खेळाच्या अधीन गेले असल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. तर काहींचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. अनेक तरुण हारजीतीच्या
तणावाने इतरही व्यसनाच्या आहारी गेले आहेत. मटका चालवणारांना पोलिसांच्या आशीर्वादाने
व्यवसाय मिळाला असला तरी या व्यवसायाच्या नादी लागलेले इतर व्यावसायिक मात्र बरबाद झाल्याचे
चित्र स्पष्ट दिसत आहे. मटक्याच्या व्यसनाच्या अधीन गेलेल्या तरुणांच्या घरातील सदस्य मात्र चिंताग्रस्त
आहे. मटका या जुगाराचे अल्पवयीन मुलांना मोठ्या प्रमाणात व्यसन जडले आहे. ऐन शिकण्याच्या
वयात ही मुले मटका जुगाराच्या नादी लागल्याने अनेकांचे भवितव्य अंधातरी झाल्याचे जाणवते. मटका
जुगाराच्या हार, जीतीमुळे अनेक तरुणांना दारुचे व्यसन जडले असल्याने घरातील दररोज होत असलेल्या
वादावादीमुळे संसार उद्ध्वस्त होताना दिसत आहे. मदनसुरी, कोकळगाव हे अवैध व्यावसायासाठी
प्रसिद्ध आहे. त्यामुळे बाहेरगावचे जुगार शौकिन लोकही कामधंदा न करता येथे येऊन दिवस दिवस
बसत असतात. पोलिसांचा कायमच येथील अवैध व्यवसायाला वरदहस्त राहिल्याने अवैध
व्यावसायिकांची मुजोरी सुरु असते. अलिकडच्या काळात सोशल मिडीयाचा वापर मटका जुगारासाठी
केला जातो. मटका व्यवसायाला सोशल मिडीयामुळे चांगलेच बळ मिळाले असून, सोशल मीडियाच्या
माध्यमातूनच मटका जुगाराचा खेळ खेळला जातो. तसेच अर्थिक व्यावहारही ऑनलाईनच होत
असल्याने छुपे रुस्तुमांची संख्या वाढली आहे. यामुळे तरुणपिढी पूर्णपणे वाया जात असून खरंच पोलीस
आपले अवैध व्यावसायिकांशी असलेले हितसंबध बाजूला ठेऊन हा अवैध व्यवसाय बंद होण्यासंबधी
कारवाई करतील काय? की पहिले पाढे पंचावन्न चालू ठेवत आपल्या अकार्यक्षमतेचे दर्शन घडवतील,
असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला आहे.

.jpg)

0 Comments