Advertisement

गावकट्ट्यावर न्याय देणारे ज्येष्ठच खरे न्यायाधीश न्यायाधीश के. पी. गाडे

 गावकट्ट्यावर न्याय देणारे ज्येष्ठच खरे न्यायाधीश 

 न्यायाधीश के. पी. गाडे 



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


निलंगा : पूर्वी गावातील चावडी, कट्टा किंवा वाड्यावरच न्यायव्यवस्था चालायची. गावातील ज्येष्ठ मंडळी वादी–प्रतिवादींचे म्हणणे ऐकून तिथेच तात्काळ न्यायदान करत. त्यांच्या निर्णयावर दोन्ही बाजू समाधानी व्हायच्या. त्यामुळे अशा थोर ज्येष्ठांचे स्थान तेव्हाच्या काळात न्यायाधीशांपेक्षाही वरचढ होते, असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश के. पी. गाडे मॅडम यांनी केले.

कासार शिरसी येथे निलंगा विधी सेवा समिती व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मोबाईल लोक अदालत मोबाईल व्हॅन’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी या लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती गाडे म्हणाल्या,की,

“न्याय मिळवण्यासाठी कोर्टातच जावे लागते ही भावना चुकीची आहे. न्याय आपल्या दारी येत आहे, याचे स्वागत करून प्रलंबित वाद निकाली काढा.”

कार्यक्रमात ग्रामपंचायतीतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सरपंच सौ. ममता डोंबाळे, उपसरपंच अप्पू चिंचनसुरे, माजी सरपंच बडे साहेब लक्कड, सोसायटीचे चेअरमन गुरुनाथ पप्पा मिलगिरे, व्हाइस चेअरमन ओम चिंचनसुरे, ॲड. मनोज सलगर, ग्रामविकास अधिकारी विजय सूर्यवंशी, न्यायालयीन कर्मचारी सुनील चांदोरीकर, कैलास गरुड तसेच एपीआय प्रवीण राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments