Advertisement

सोयाबीन काढणीचे गुत्ते घेतलेल्या माय माऊल्यांचेच शेतकऱ्याने काढले आर्थिक गुत्ते "माय माऊलीं महिलांचा गैरफायदा घेऊन कमी मोबदल्यात अधिकचे कामाला जुंपण्याचा आखला डाव

 सोयाबीन काढणीचे गुत्ते घेतलेल्या माय माऊल्यांचेच शेतकऱ्याने काढले आर्थिक गुत्ते

"माय माऊलीं महिलांचा गैरफायदा घेऊन कमी मोबदल्यात अधिकचे कामाला जुंपण्याचा डाव 


मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9420010756



लातूर : मौजे कोकळगाव ता. निलंगा येथील रहिवासी असलेले  महिला मजूर मौजे सरवडी येथील रहिवासी असलेले शेतकरी वरसूकेत मोतीराम मोहिते व अशोक मोतीराम मोहिते यांच्या शेतात दिवाळीपूर्वी सोयाबीनचे गुत्ते काढण्यासाठी गेले होते,सदर गुत्त 55 हजार रुपये या प्रमाणे ठरले होते,सदर 5 एकर सोयाबीन काढले व नंतर जास्त रान असल्याने सदर गुत्ते अंगावर पडत होते सदर शेतमालकाने फसवेगिरी करत भोळ्या मजूर महिलांना अधिक 14 पिशव्या असलेले रान 9 पिशव्याच आहे असे खोटे बोलून महिलांना कमी मोबदल्यात जास्तीचे काम करून घेण्यात पटाईत असलेले वरील दोन्ही महाशय फसवल्याची बाब पुन्हा मजूर महिलांना लक्षात येताच त्यांनी सदर रान जास्तीचे आहे तुम्ही आम्हाला फसवत आहे म्हणून  मजूर गरीब महिलांच्या लक्षातच आले नाही, जास्त सोयाबीनचे शेत असल्याने सदर गूत्ते अंगावर पडत आहे आम्हाला सणापर्यंत काढणेही श्यक्य होणार नाही, तसेच इतर मजूर पण मिळत नाहीत म्हणून थोडीफार वाढीव रक्कम द्यावे अशी विनंती बिचाऱ्या मजूर माऊल्यांनी शेत मालकांना  केली तरीही तो शिल्लक दाम तर दूरच.उलट तुम्हाला कुठे जायचे तिथे जावू शकता, मी इतरांना कितीही रुपये देईन पण तुम्हाला यापुढे एक फुटकी  मणी सुद्धा देणार नाही.अशी धमकी देऊन 

 त्यामुळे सर्व मजूर महिलांनी नाविलाजस्त्व अंगावर पडत आहे म्हणून वापस गावी आले. त्यांना शेत मालकाकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही म्हणून सदर सोयाबीन काढणीचे अद्यापपर्यंत केलेले काम 30,000 हजारांचे झाले आहे. फक्त 5 हजार इसारत म्हणून दिले आहे. आणखी 25000 रुपये येणे आहे.

दिवाळी होऊन अद्याप पर्यंत तो जितके काम झाले आहे तेवढे तर मजूर महिलांचे पैसे द्या म्हणून वारंवार विनंती केली तरीही तो पैसे देण्याच्या प्रयत्नात तर नाहीच शिवाय महिलांना पैसे अजिबाद देणार नाही, तुम्हाला कुठे जायचे तिथे जावू शकता. मि इतर ठिकाणी हजारो रुपये देईन पण तुम्हाला देणार नाही अशी अपमानास्पद धमकी वजा तो करत आहे. यामध्ये कांहीं मजूर महिला कांहीं विधवा देखील आहेत,ज्यांचे हातावर पोट आहे अशा महिला व कांहीं विधवा  मजूर महिला ज्यांचे काम केल्याशिवाय कांहीच भागत नाही, अशा गरीब महिला दुसऱ्याने गुत्ते घेणाऱ्यांनी चला कामाला म्हणून सहज नेहल्या आहेत, अशा महिलांना मात्र उन्हातान्हात  5 एकर सोयाबीन काढले असता पदरी निराशा अपमानास्पद वागणूक, महिलांनाच उलटे बोलने अशा समस्यांना सामोरे जावे लागले आहे व त्यांना काम करून अन्याय सहन करावा लागत आहे. शेवटी मजूर महिलांनी आम्ही जितके काम केलेले आहे तितकेच पैसे द्या किंवा त्यांच्यापेक्षाही कमी तर द्या आम्ही सोसून घेऊ, पण आमच्या उन्हातान्हात घाम गाळून सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत न थांबता काम केलेले आहे त्यामुळे देण्याची विनंती केली तरीही आज रोजी तीन महिने झाले तरीही पैसे देणार नाही या भूमिकेवर तो ठाम आहे. याउलट महिलांना कोणत्यातरी विषयाला धरून सुरुवातीला तुम्ही बोलले आणि गुत्तेच का काढले नाही या गोष्टीला धरून वाकडे बोलने दमदाटी करणे, काय करायचे आहे ते करून घ्या असे म्हणत बिचाऱ्या मजूर माय माउलीना अपमानास्पद हीन वागणूक देत आल्यामुळे राज्यात एकीकडे मुख्यमंत्री लाडकी मजूर भोळी भाबडी महिलांची आर्थिक पिळवणूक केली जाते तर मजूर बहिणीचा अपमानास्पद ग्रामीण भागात वागणूक मिळत असल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे. यामुळे अशा अल्प मोबदल्यात जास्तीचे काम करून पटाईत असलेल्या महाशय कडून वेळेत पैसे मिळवून देऊन अशा मुजोर माय माऊलींचे आर्थिक शोषण करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा  आगामी काळात संबधित कार्यालयावर किंवा शेतकरी वरसुकेत मोतीराम मोहिते, अशोक मोतीराम मोहिते यांच्या घरासमोर किंवा संबधित पोलीस कार्यालयासमोर अखिल भारतीय आदिवासी महर्षी वाल्मिकी संघटनेच्या वतीने तीव्र उपोषण करणार असल्याचा इशारा अखिल भारतीय आदिवासी महर्षी वाल्मिकी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments