किल्लारीच्या महाराष्ट्र विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
किल्लारी : येथील महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयात सन १९९९ च्या इयत्ता १० वीच्या व २००१ च्या १२ वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा दि. १८.मे २०२५ रोजी मोठया उत्साहात पार पडला.
अध्यक्षस्थानी प्राचार्य के. एस. सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य एस. बी. भोसले व शिक्षक घोगे, ओटे, कुंभार , उमाटे,जोडवे, बोरुळे, कुलकर्णी, गायकवाड ,जाधव , सरदेशेटे , माने, वाघमारे ठाकुर मॅडम, शिक्षकेतर कर्मचारी भोसले फुलचंद, गाडेकर, कांबळे धनराज आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने व सरस्वती पुजनाने करण्यात आली.त्यानंतर दिवंगत
शिक्षकांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. ३.१० वी चे वर्गशिक्षक उमाटे यांनी सर्व विद्याध्यांना सखोल मागदर्शन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शाळेचे संस्थापक अध्यक्ष फुलचंद अण्णा मोसले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमस्थळी शिक्षकांचा प्रवेश होताच पुष्प वर्षाव करून स्वागत करण्यात आले. त्यांनतर शैला खजुरे, सुवर्णा सोनवणे, अंजली भोसले, पल्लवी जिङगे, अंजली सावंत, माधुरी दस्तुरे या विदयार्थ्यांनीं स्वागत गीत सादर केले. त्यानंतर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ, फेटे बांधुन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे
प्रास्ताविक सुवर्णा सोनवणे तर सूत्रसंचालन हरोशन गोयेकर यांनी केले. विदयार्थ्यांची थोडक्यात ओळख प्रदिप भोसले व अंजली भोसले यानी करुन दिली.
यावेळी आनंद बाबळसुरे, गणेश माने, अमोल बिराजदार, राहुल भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच परदेशातील वास्तव्यास असलेले जयदीप जाधव हे कार्यक्रमासाठी उपस्थित राहू न शकल्यामुळे त्यांनी दूरध्वनी वरून सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच प्रदीप भोसले यांनी इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या असलेल्या शिक्षक व माजी विद्यार्थी यांचे किस्से कथन करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच शितल भोसले- पाटील सुवर्णा सोनवणे -माने यांनी शाळेला सरस्वतीची प्रतिमा भेट दिली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप भोसले, गणेश माने, विकास सावंत, कोंडीबा घोडके, गोपाळ सुलाखे, रफीक शेख,हरिराम गोयेकर, नरसिंग उमाटे, सुवर्णा सोनवणे, अंजली भोसले, शैलजा खजुरे इत्यादी माजी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. अगदी खेळीमेळी उत्साहपूर्ण वातावरणात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला.
0 Comments