कोकळगाव मुदगड एकोजी रस्त्याचे डांबरीकरण प्रगतीपथावर ; शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9420010756
निलंगा : निलंगा तालुक्यातील कोकळगाव मुदगड एकोजी,सरवडी ह्या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या नव्याने डांबरीकरणाचे काम जलद गतीने सुरू आहे. औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नांमुळे ही कामे सुरू आहेत. ही कामे सुरू झाल्याने या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. माजी उप सभापती ज्ञानेश्वर वाकडे यांनी मागील चार वर्षापासून प्रशासनाकडे रस्त्याच्या बाबतीत निवेदने दिली होती.तसेच सातत्याने पाठपुरावा करत अखेर औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नामुळे निलंगा तालुक्यातील कोकळगाव, सरवडी, मुदगड एकोजी ह्या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या नव्याने डांबरीकरणाचे काम जलद गतीने सुरू आहे.
यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना व सर्व वाहन धारकांना सोयीस्कर रस्ता लवकरच होणार आहे.
या गावांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची मागील अनेक वर्षापासून बिकट अवस्था झाली होती. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने व पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत होते. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना व नागरिकांना ये – जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती.
आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नातून ह्या रस्त्यांचे नव्याने डांबरीकरण करुन रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी या भागातील नागरिक करीत होते. त्यामुळे आमदार अभिमन्यू पवार यांनी या भागातील रस्त्यांच्या प्रश्नाबाबत लक्ष घालून मागील काही दिवसांपासून ह्या रस्त्यांच्या नुतन डांबरीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. सध्या हे काम जलदगतीने सुरू आहे.आमदार पवार यांच्या प्रयत्नामुळे या भागातील प्रलंबित रस्त्यांची काम मार्गी लागली आहेत. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments