Hot Posts

6/recent/ticker-posts

मृगाची दमदार एंट्री, लातूर जिल्ह्याला पावसाने झोडपले,तेरणा नदी दुथडी भरून वाहू लागली

 मृगाची दमदार एंट्री, लातूर जिल्ह्याला पावसाने झोडपले,तेरणा नदी दुथडी भरून वाहू लागली

मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


 लातूर : ढगांचा गडगडाट, विजांचा लखलखाटा सह सोमवारच्या रात्री लातूर जिल्ह्यातील अनेक तालुक्याला पावसाने झोडपले.यंदा पावसाने वेळेत दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे.  जिल्ह्यातील परिसरात सोमवारी रात्री दोनच्या सुमारास दीड तास जोरदार पाऊस झाला.

या पावसामुळे तेरणा नदी दुथडी भरून वाहत असल्याने या नदीवरून अनेक गावाला जोडणाऱ्या रस्त्यांवरची वाहतूक पुलावर पाणी आल्याने कांहीं काळ ठप्प झाली होती.

यंदा पावसाने दमदार सुरवात केल्याने पेरणीपूरक पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीच्या लगबगीत आहेत.

Post a Comment

0 Comments