Hot Posts

6/recent/ticker-posts

आदर्श माता पिता पुरस्काराने किल्लारीतील भोसले कुटुंबीय सन्मानित, हेल्पर ते उद्योजक मुलाचा प्रवास

आदर्श माता पिता पुरस्काराने किल्लारीतील भोसले कुटुंबीय सन्मानित, हेल्पर ते उद्योजक मुलाचा प्रवास


मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174



किल्लारी : किल्लारी येथील तरुणाने पंधरा वर्षांपूर्वी पुण्यामध्ये जाऊन एका वेल्डिंग वर्कशॉप मध्ये हेल्पर म्हणून कामाला सुरुवात केली. तो उद्योग जगतात नाव करत अनेक तरुणांच्या हाताला काम देत असल्यामुळे मराठवाडा मित्रपरिवार व मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठानने गौरव कष्टाचा, गौरव जिद्दीचा मराठवाडा रत्नांचा स्नेह मेळावा या कार्यक्रमांमध्ये त्याच्या आई वडिलांचा पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते शनिवारी ( ता. २४ ) एमआयटी कॉलेज पुणे येथे वडील ज्योतीराम भोसले, आई वनमाला भोसले यांचा आदर्श माता पिता पुरस्कार देऊन सत्कार, सन्मान केला.


किल्लारी येथील तरुण विकास ज्योतीराम भोसले याने पंधरा वर्षांपूर्वी पुण्यामध्ये जाऊन एका वेल्डिंग वर्कशॉपमध्ये हेल्पर म्हणून काम सुरू केले. गरम लोखंडाचा धूर, अंगावर उष्णतेचे चटके, डोक्यातून, डोळ्यातून वाहणारा घाम हेच त्यांच्या शिक्षणाचे वर्ग बनले. विकास यांना काम करता करता वेल्डिंग क्षेत्रातील बारकावे लक्षात येऊ लागले. त्यांनी वेळोवेळी कामासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात केली. हळूहळू त्यांचा प्रामाणिकपणा, गुणवत्ता आणि वेळेवर काम पूर्ण करण्याची शिस्त यामुळे ग्राहकाचा विश्वास मिळत गेला. आज त्यांचे वर्कशॉप विकासदीप फॅब्रिकेशन या नामांकित कंपनीमध्ये रूपांतरीत झाले आहे. यातून विकास यांचे व्यक्तिमत्त्व घडले. त्यातून तो उद्योजक जगतात नाव करत अनेक तरुणांच्या हाताला काम देत असल्यामुळे त्यांचा व त्याच्या आई वडिलांचा पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस, डॉ. मंगेश कराड, पुणे पोलीस आयुक्त राजकुमार शिंदे, आदींच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले. यावेळी कुटुंबीय सुनीता जाधव, परमेश्वर भोसले आदींची उपस्थिती होती. 



पूर्ण...

Post a Comment

0 Comments