Hot Posts

6/recent/ticker-posts

कोकळगाव येथे पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

 कोकळगाव येथे पर्यावरण दिनानिमित्त  वृक्षारोपण



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174



निलंगा - कोकळगाव येथील आयुष्यमान आरोग्य मंदीर उपकेंद्रात 5 जुन जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालय कोकळगाव व आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्र कोकळगाव यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी निसर्गसंपदेचे जतन आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा संकल्प केला. आजचा पर्यावरण दिन साजरा करत असताना आपण सर्वांनी एका विचाराने पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी कटीबद्ध होवू या असे मत आरोग्य कर्मचारी राहुल भोसले यांनी व्यक्त केले.

 पर्यावरणाच्या रक्षणासाठी व संवर्धनासाठी समाजात जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. विशेषतः येणाऱ्या पिढीवर तसे संस्कार रुजवून एक समृद्ध पिढी यातून निर्माण होईल. पर्यावरण समृद्धीसाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प यानिमित्ताने करण्यात आला.

 यावेळी ग्रामविकास अधिकारी धनंजय धवन, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत रूमणे, पत्रकार द्रोणाचार्य कोळी,आरोग्य कर्मचारी, राहुल भोसले, आरोग्य सेविका श्रीमती.सी.के.जाधव, आशा स्वयंसेविका श्रीमती.सी.आर.सूर्यवंशी, सेविका श्रीमती.कमलबाई सूर्यवंशी, ग्रामपंचायत कर्मचारी मुन्ना पठाण, माजी सैनिक वैजनाथ लामतुरे व ग्रामस्थ आदींची उपस्थिती होती. कोकळगाव आरोग्य उपकेंद्रात कार्यरत असलेले आरोग्य कर्मचारी यांच्या प्रामाणिक सेवेमुळे गावातील उपकेंद्राच्या कायापालट झालेला असून, निसर्गरम्य वृक्षाची शोभा गर्दी करू लागली आहे.तसेच आरोग्य उपकेंद्राला ॲक्टिव टीम लाभल्याने विविध आरोग्य जनजागृती संदर्भात उपक्रम सातत्याने राबवले जात असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे


.

Post a Comment

0 Comments