प्रांताधिकारी बी आर माळी यांच्या विरोधात तीव्र जन आंदोलन उभा करणार.
गणेश अंकुशराव
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9420010756
पंढरपूर : येथील प्रांताधिकारी बी आर माळी हे आपल्या पदाचा गैरवापर करून कायद्याचा चुकीचा अर्थ लावून कोळी महादेव जमातीच्या लोकांना सामाजिक आरक्षणापासुन वंचित ठेऊन त्रास देत असल्याने सर्व संघटना व समाज बांधवांशी चर्चा करून त्यांच्या विरोधात लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिला आहे.
सर्व माघास प्रवर्गातील व अनुसूचित जमातीच्या लोकांना जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी शासनाने महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या विमुक्त जमाती मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग अधिनियम 2000 व नियम 2003 विधानसभेने हा कायदा केला आहे.
या कायद्यातील तरतुदीप्रमाणे पुरावे जोडून विहित नमुन्यात जरी जात प्रमाणपत्र मागणी अर्ज केला तरी त्यांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन नकारात्मक व पूर्वग्रहदुषित आहे. सुनावणीच्या वेळीही अभ्यासक बाळासाहेब बळवंतराव हे त्यांच्या शंकाचे निरसन करत असतांना युक्तीवाद व्यवस्थित ऐकुण न घेता ठीक आहे मला सर्व माहित आहे मी ऐकले आहे. असे म्हणत होते. त्यांच्याकडून कायद्याची पायमल्ली होत आहे. कायदा विधानसभेत बनला त्या विधानसभेचाही ते अपमान करत आहेत. कायद्यापेक्षा स्वतःला मोठे समजतात की असा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच मंगळवेढा येथील महा ई सेवा केंद्र चालक कोळी जमात बांधवांचे जात प्रमाणपत्र मागणी प्रस्ताव स्विकारत नाहीत . कारण विचारले असता नांव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की वरिष्टांनी घेऊ नका म्हणून सांगितले आहे असे सांगितले.. त्यांच्या या अन्यायाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वाल्मीकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दैनिकांशी बोलतांना दिला आहे
0 Comments