नगर परिषदेच्या बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांना निरोप
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा : निलंगा नगर परिषदेत आस्थापनेवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या इतरत्र बदल्या झाल्याने त्यांना निरोप देण्यात आला तर त्यांच्या जागेवर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
निलंगा नगर पालिकेत आस्थापना विभागात असलेले कर्मचारी अभंग गायकवाड सौ.अरुणा कौडगावे , मुसा मुबारक,धाईत कैलास ,सौ सोमवंशी विद्या अशा एकूण पाच कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्या बाहेर बदल्या झालेल्या असून त्यांच्या जागेवर विवेक शाहीर (कर विभाग) ,अनिस शेख(नगररचना विभाग), शाहीन शेख(संगणक विभाग), प्रदीप रणखांब (कर विभाग) अंबर गोविंद (लेखा विभाग) इत्यादी कर्मचारी निलंगा नगर परिषदेमध्ये रुजू झाल्याने नगर पालिका सभागृहात त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी निलंगा नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक कमलाकर सरवदे, कर अधीक्षक दिगंबर साठे ,चनवडे सुनील, रमेश कांबळे प्रेमनाथ गायकवाड,लिंबराज सूर्यवंशी, गंगाधर खारोडे ,गंभीरे दिलीप ,विकास पवार, कृष्णा कांबळे सौ.मह्माने ऐश्वर्या, महादेव कांबळे,भरत शिंदे ,अक्षय कांबळे , जाफर अन्सारी,प्रकाश गायकवाड, राहुल शेटकर ,विशाल सांडूर, इत्यादी अनेक कर्मचारी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री प्रेमनाथ गायकवाड यांनी मानले.
0 Comments