काळ्या बाजारात विक्री होत असलेला खताचा टेम्पो छावा संघटनेच्या सतर्कतेमुळे निटूर पोलिसांच्या ताब्यात
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा : तालुक्यातील निटूर येथे सोलापूर वरून आलेल्या एका ट्रक मधून नीटूर परिसरात शेतकऱ्याला बोगस खत हे अवैध मार्गाने विक्री होत होते ही बाब छावा संघटनेचे निलंगा तालुका अध्यक्ष तुळशीदास साळुंखे यांच्या निदर्शनात येताच त्यांनी तात्काळ ट्रक व अन्य टेम्पो निटूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. कृषी विभाग व पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे.
सविस्तर माहिती अशी की आज शुक्रवारी सकाळी निटूर येथे एका खाजगी पेट्रोल पंपावर
ट्रॅक क्रमांक MH 24 J 8111 हा दहा टायर ट्रक व आयशियार टेम्पो क्रमांक MH 04 FU 8231 यामधून सम्राट ऍग्रो इंडस्ट्रीज सोलापूर या कंपनीचा खात भरून निटूर, खडकउमरगा या गावात शेतकऱ्याला विना पावती अल्प दरात विक्री करताना छावा संघटनेला आढळताच छावा संघटनेचे निलंगा तालुका अध्यक्ष तुळशीदास साळुंखे यांनी ट्रक व टेम्पो निटूर पोलिसांमध्ये जमा केले.
निलंगा तालुका कृषी अधिकारी नाथराव शिंदे यांच्या पथकाने पंचनामा केला सदरील ट्रक व टेम्पो मधील खताची किंमत दोन लाख 78 हजार, व ट्रक किंमत सहा लाख टेम्पो ची किंमत तीन लाख,असा एकूण 11 लाख 78 हजार रुपयाचा मुद्देमाल निटूर पोलिसांनी ताब्यात घेतला असून सदरील कंपनीचे सॅम्पल हे तपासणीसाठी कृषी विभागाने संबंधित विभागाकडे पाठवले आहे. या परिसरात खत विक्री करणारा व मुख्य एजंट सज्जन सूर्यकांत गावडे राहणार सोलापूर, ट्रक चालक मोहसीन शेख वय 26 वर्ष राहणार डोंगरज तालुका चाकूर, टेम्पो चालक विशाल हनुमंत आरीकर तालुका शिरुर अनंतपाळ तिघांना पोलिसांनी आरोपी करून पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास निटूर पोलीस चौकीचे बीट जमादार सुधीर शिंदे पोलीस कॉन्स्टेबल सांडूर हे करीत आहेत.
निलंगा तालुक्यातील मागील काही अनेक दिवसापासून सम्राट ऍग्रो इंडस्ट्रीज बोगस कंपनीचा खात सर्रासपणे विना पावत्या विक्री होत असे परिसरातील शेतकरी सांगत आहेत.
- दोषीवर कडक कारवाई करणार शेतकऱ्याने अशा प्रकारचे बोगस खते बियाणे घेऊ नये असा कुठे प्रकार जर निदर्शनात आला तर कृषी विभागाला संपर्क करावे व निलंगा तालुक्यातील सर्व खत विक्री करणाऱ्या दुकानांनी खताचा शिल्लक व विक्री साठा बाहेर बोर्ड लावावे
नाथराव शिंदे,तालुका कृषी अधिकारी निलंगा
निलंगा तालुक्यात मागील अनेक दिवसापासून निलंगा तालुका कृषी अधिकारी यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात सोलापूर वरून सम्राट ऍग्रो कंपनीचा बोगस अवैध खत सर्रासपणे तालुक्यात विक्री होत आहे. तोच हा ट्रक आज निटूर पोलीसात जमा केला आहे. तात्काळ या मागची साखळी पकडून या कंपनीवर व दोषी कृषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी
तुळशीदास साळुंखे छावा संघटना निलंगा तालुका अध्यक्ष निलंगा
0 Comments