Hot Posts

6/recent/ticker-posts

सामाजिक कार्यकर्त्या मनीषा होळकुंदे आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

सामाजिक कार्यकर्त्या मनीषा होळकुंदे  आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित 




मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


निलंगा : इंग्लंड येथील आंतरराष्ट्रीय संस्था ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स कार्य समितीच्या वतीने कासार शिरसी येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मनीषा होळकुंदे यांना दिनांक 17 मे रोजी गोवा येथील द फर्नकदंबा येथे या संस्थेचे अध्यक्ष माॅनवेल अँटोनिया यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले याप्रसंगी सर्वश्री मनीष कुमार डॉक्टर दीपक हरके डॉक्टर मरिया अभिनेते करण मोहरा व आंतरराष्ट्रीय समितीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
पती निधनाचे दुःख बाजूला सारत सतत सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणाऱ्या कासार शिरसी येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मनीषा राजेंद्र होळकुंदे या गेली अनेक वर्षापासून सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत त्यांनी एकता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अनेक निराधारांना वृद्धांना आधार दिला आहे आधार या त्यांच्या वृद्धाश्रमाच्या माध्यमातून त्यांचे कासार शिरशी सह लातूर व सोलापूर जिल्ह्यात गौरवास्पद कार्य आहे त्यांच्या या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरून घेण्यात आली त्यांच्या या स्तुत्य कार्याची दखल   घेण्यात आली त्यांच्या या स्तुत्य कार्याचा त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरून सन्मानपत्र मेडल व मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले त्यांच्या या पुरस्काराची परिसरात सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments