Advertisement

डोंगराळे घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्या म्हणत कल्याणी माळेगाव येथे कँडल मार्च काढून तीव्र निषेध

 डोंगराळे घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्या म्हणत कल्याणी माळेगाव येथे कँडल मार्च काढून तीव्र निषेध 


मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174




निलंगा : नाशिक जिल्ह्यातील मालगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेने राज्य हादरले आहे. १६ नोव्हेंबर रोजी झालेल्या या गुन्ह्यात गावातील २४ वर्षीय विजय खैरनर याला अटक करण्यात आली आहे.पीडित परिवाराला लवकर न्याय मिळावा, यासाठी या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करावी आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी निलंगा तालुक्यातील कल्याणी माळेगाव येथे विद्यार्थी, युवक युवती व महिलांनी कँडल मार्च काढून तीव्र निषेध व्यक केला आहे.  या प्रकरणी न्यायप्रक्रिया वेगाने पार पडण्यासाठी फास्ट-ट्रॅक कोर्टात खटला चालवावा आणि दोषीला दोष सिद्ध झाल्यास लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी महेश सावनगारे, सुमित यौधरी,शिवाजी नांबळकर, राम शिंदे, राम नरूद, धीरज परिल, राहुल चौघरी, सौरभ शिंदे, सचिन साठे, शालेय विद्यार्थी युवक युवती व  महिला भगिनीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments