Hot Posts

6/recent/ticker-posts

अभिजित लामतुरेचा अमुर्त कलेचा आविष्कार मुंबई येथे १४ ते २० ऑक्टोबर दरम्यान प्रदर्शन

 अभिजित लामतुरेचा अमुर्त कलेचा आविष्कार

मुंबई येथे १४ ते २० ऑक्टोबर दरम्यान प्रदर्शन



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

९८२२०४११७४

 




लातूर : निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील रहिवाशी असलेले अभिजित बाबूराव लामतुरे यांनी  ग्रामीण जिवनातील साधेपणा , भावविभोरता , जिव्हाळा , निसर्गाशी असलेले अतूट नाते या बाबींचा त्यांच्या  चित्रातील गूढ , गम्य अशी सुचीर्भूत सौंदर्याशी नाते जडले आहे. सामान्य कुटूंबातील अभिजीत याने आर्टिस्टची कला जोपासत त्यांच्या चित्रकलेचे मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरीत १४ ते २० ऑक्टोबर दरम्यान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.कला दृश्यातून दृस्थापर्यंतचा कलावंताने केलेला सौंदर्यपूर्ण प्रवास कलेच्या विशुद्धतेची प्रचिती देते.अमूर्त कलेकरीता कलावंताची अशीच वृती पोषक ठरत असते . अमूर्त कलेत गूढ परंद्रगम्य अनाकलनीय परंतू सुखद , अबोध अभिभूत असे अनुभव येत असतात अशा कलेत कथन नसते . त्यामुळे अमूर्त कलेत अर्थ शोधावयाचा प्रयत्न करावयाचा नसतो ती कला अनुभवायची असते . अशाच  प्रकारची आहेत . अभिजीतच्या चित्रात सपाट पृष्ठभागावर



सुटसुटीत आकाराची रचना आणि रंगाची झिलईदार पारदर्शक  आच्छादन असते.आकार आणि अवकाश यांचा संबंध केवळ रचनेपुरता मर्यादीत न रहाता,त्याच्यातील एकमेकातील ( गुंतवणुक ) गुंवाभूत नाट्यमय आहे.

रंगाना त्याच्या स्वतःच अंगीभूत सौंदर्य लाभलेलं असतं,ते सौंदर्य अबाधीत ठेवून त्याचं सत्व अधिकाधिक खुलवने अभिजीत यांना छान जमलेलं आहे.एकंदरीत  असे म्हणता येईल की विविध रंगाचे अनेक पालक पारदर्शक थरावर थर अंधरत अभिजितची चित्र आकार घेऊ लागत आहेत.या भरांची एकमेकातील गुंतागुंत म्हणजे तलम रेशमी आच्छादने माखलेली सांस्कृतीक वंगण होय . अनेक रंगाच्या पातक रेशमी तान्याबान्यातील आकाराची गुंवणुक अभिजितच्या कलेचा आविष्कार वाढवतात.

भारतीय अध्यात्मिक व दार्शनिक परंपराना अमूर्तवादी विचार नविन नाही . त्यामुळे भारतीय मन अमूर्त कलाविष्कारातून केवळ सौंदर्य शोध नव्हे तर परमानंद मिळवले  जे जे स्कूल ऑफ आर्टने अमूर्त चित्रकलेत नवनवीन प्रतिमाने निर्माण केले आहेत त्यात वासुदेव गायतोंडे , प्रभाकर कोलते अकबर पदमसी या श्रृंखलेत पुढील आश्वासक नांव अभिजीत बी . लामतुरे यांचे आहे . असे म्हणणे वावगे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments