आमदार अभिमन्यू पवार यांचे कडून मुळजकर कुटुंबियांचे सांत्वन
मुख्य संपादक: द्रोणाचार्य कोळी
कासार सिरसी: आमदार अभिमन्यू पवार यांनी शनिवार दिनांक 6 जुलै रोजी कासार सिरसी येथील जेष्ठ पत्रकार श्याम मुळजकर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे पुत्र शशांक मुळजकर यांच्या निधनानिमित्त मुळजकर कुटुंबियांचे सांत्वन केले यावेळी अनेक कार्यकर्ते यांची उपस्थीती होती.
सोमलिंगेश्वर विद्यालय कोराळी येथील कर्मचारी व येथील पत्रकार शाम मुळजकर यांचे पुत्र शशांक मुळजकर वय 42 वर्ष यांचे शुक्रवार दिनांक सहा जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पार्थिवावर अनेक मान्यवर व्यापारी व समाज बांधवांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यांचे पश्चात पत्नी दोन मुलं एक बहीण व वडील असा परिवार आहे कैलासवासी शशांक यांच्या निधना निमित्त येथील सोमलिंगेश्वर विद्यालय व श्री करी बसवेश्वर विद्यालयच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


0 Comments