Hot Posts

6/recent/ticker-posts

काँक्रिटीकरण व अंडरग्राउंड गटार सर्वसाधारण सभेला तात्काळ मंजूरी द्या अन्यथा 15 जुलै रोजी अन्नत्याग आमरण उपोषणाला बसणार अरविंद नाईकवाडी

 काँक्रिटीकरण व अंडरग्राउंड गटार सर्वसाधारण सभेला तात्काळ मंजूरी द्या अन्यथा 15 जुलै रोजी अन्नत्याग आमरण उपोषणाला बसणार 

 अरविंद नाईकवाडी 



मुख्य संपादक: द्रोणाचार्य कोळी 

9822041174


मंगळवेढा:मंगळवेढा शहर हद्दीतील मुजावर गल्लीत येथील कोळी बोळामध्ये बसवण्यात आलेले पेव्हर ब्लॉक खराब झालेले असून तेथे येणे जाण्याचे चालू रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत व पेव्हर ब्लॉक खराब झालेले आहे त्या खड्ड्यामध्ये पाणी साचून सदरच्या ठिकाणी घाण पसरत आहे तसेच तेथील खड्ड्यांमुळे सदर ठिकाणी राहत असलेले नागरिकांना त्याचा अडथळा निर्माण होत असून येणे जाणारे लोकांना व विशेष शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना वयोवृद्ध नागरिक खड्ड्यामध्ये अडकून पडले आहेत तरी सदरचे पेव्हर ब्लॉक काढून तेथील बोळा मध्ये नवीन कॉंक्रिटीकरण व अंडरग्राउंड गटार करणे अन्यथा अन्नत्याग आमरण उपोषण करण्यात येईल  संदर्भीय पत्राद्वारे दि 12/6/2024 रोजी आपल्या नगरपालिकेला कळवले आहे कळवल्यानंतर  आपण मला लेखी पत्र दिले होत सदरचा विषय सर्वसाधारण सभेला देण्यात आलेला आहे असे मला लेखी पत्र दिले होते परंतु आपण त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही त्यामुळे स्थगित केलेले आंदोलन पुन्हा चालू करत आहोत काही कमी जास्त झाल्यास व कायदा सुव्यवस्था बिघडल्यास नगरपालिका जबाबदार राहील दि10/1/2024 व दि 12/6/2024 रोजी निवेदन देऊन सुद्धा आपण त्याची दखल घेतलेली नाही तरी आपण या दोन दिवसांमध्ये आपण मला लेखी दिलेल्या पत्रानुसार तो ठराव मंजूर न झाल्यास दि 24/6/2024 रोजीचा आंदोलन स्थगित केलेले पुन्हा आम्ही चालू करत आहोत दि 15/7/2024 रोजी आपल्या नगरपरिषद कार्यालय समोर महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने अन्नत्याग आमरण उपोषण करणार असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे मंगळवेढा शहर अध्यक्ष अरविंद नाईकवाडी यांनी दिला आहे

Post a Comment

0 Comments