Hot Posts

6/recent/ticker-posts

कोकळगाव येथे मोहरम उत्सवास प्रारंभ

 कोकळगाव येथे मोहरम उत्सवास प्रारंभ 



मुख्य संपादक:द्रोणाचार्य कोळी 

9822041174



निलंगा: मुहर्रम हा इस्लामिक कॅलेंडरचा पहिला महिना आहे , आणि युद्धावर बंदी घालण्यात आलेल्या वर्षातील चार पवित्र महिन्यांपैकी एक आहे. मोहरमचा दहावा हा आशुरा म्हणून ओळखला जातो, जो इस्लाममध्ये स्मरणाचा एक महत्त्वाचा दिवस आहे . निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथे पाच दिवस मोहरम उत्सव साजरा केला जातो.शुक्रवार दिनांक 12 जुलै रोजी पिर बसवण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने न्याल्हैद्री, पंजायतन, अली अकबर, हुसेंनपाशा, डोली,असे पिर् बसवण्यात आले आहेत. पाच दिवस मोहरम सणामध्ये हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात सण साजरा करतात.दररोज सांज रात्री धुल्ला, पवित्रा, आदी खेळण्यात तरुणाईचा उत्साह असतो. मंगळवार दिनांक 16 जुलै रोजी नववि असते त्यामुळें संपूर्ण गावाचे नैवद्य पिरांना दाखवण्यात येते.तर याच दिवशी देवांचा नवस पूर्ण केले जातात. व बुधवारी दहावीच्या दिवशी पिरांचे विसर्जन केले जाते अशा तर्हेने हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा सण मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरा केला जातो.

Post a Comment

0 Comments