Hot Posts

6/recent/ticker-posts

शामल  सोदले  यांच्या वाढदिवसानिमीत्त विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप 



मुख्य संपादक: द्रोणाचार्य कोळी 

9822041174


चाकुर: चाकुर तालुक्यांतील बनसावरगाव येथील जिल्हा परीषद शाळेत पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्या अनुसंगाणे प्रथमतः साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेच पुजन करुन पालक मेळाव्याला सुरुवात करण्यात आली ,पालक मेळाव्यात बनसावरगाव जिल्हा परीषद शाळेच्या आदर्श  सह शिक्षिका श्रीमती सोदले /घंटेवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन ,सोदले मॅडम यांनी आपला वाढदिवस आदर्शवत साजरा करत आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना इयता पाचवी नंतर सहावी व पुढील शिक्षणासाठी  दोन ते तीन कीलोमीटर चालत शाळेला जाव लागत असल्याकारणाने विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले ,यावेळी जन्मदिनाचे औचित्य साधत शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करून विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा केला. पती पत्नी  गेल्या कित्येक वर्षापासुन शिक्षण क्षेत्रात कार्यरत असुन या दांपत्यानी अनेक विद्यार्थी घडवण्याचे काम केले आहे ,याच सामजिक बांधिलकीतून शामल सोदले  यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत गरजु विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले आहे.  ,यावेळी अजीत घंटेवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगीतले की माझ्या आई बाबांच्या वाढदिसानिमीत्त आम्ही पुढील काळातही विद्यार्थ्यासाठी उपक्रम राबवणार असल्याच सांगीतले 

यावेळी   महेश बनसोडे, अजय धनेश्वर, तुळशीदास माने, जनार्दन कांबळे, रामेश्वर घंटेवाड, अजय नाचारे, भालके सर, अजित घंटेवाड, देशमुख सर, माने, सर, गोकुळ जाधव , सरपंच उषाताई कांबळे, नागनाथ शिंदाळे, गोविंद बोडके, मुख्याध्यापक घंटेवाड सर, सुनिल भुजबळ,नंदकीशोर सुडे,दिपक तोलसुरे ,संतोष घंटेवाड  सह  शाक्षेळेतील विद्यार्थी पालक ,व बनसावरगाव गावातील ग्रामस्थ उपस्थीत  होते.

Post a Comment

0 Comments