Hot Posts

6/recent/ticker-posts

कोकळगाव येथील जि .प .प्रा शाळेत तिथी स्नेहभोजनाचे आयोजन

 कोकळगाव येथील जि .प .प्रा शाळेत तिथी स्नेहभोजनाचे आयोजन 



मुख्य संपादक : द्रोणाचार्य कोळी 

9822041174



निलंगा: केंद्र सरकारच्या निर्देशानुसार संपुर्ण देशभरात 22 जुलै ते 28 जुलै या कालावधीत शिक्षण सप्ताह या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, या उपक्रमानुसार निलंगा तालुक्यातील कोकळगाव पुर्व येथे रविवार दिनांक 28 जुलै  रोजी शिक्षण सप्ताह अंतर्गत समुदाय सहभाग दिवस या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना  स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना तिथी भोजन स्नेहभोजन देण्यात आले .यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दिपक कांबळे, सह शिक्षक वीरेंद्र चामे, एम.आय.तांबोळी, सह शिक्षिका वंदना कांबळे, वृंदावना यल्लावाड, अनिता सगर, संगीता सुर्यवंशी, शिवकन्या नरवटे, शालेय अध्यक्ष सुरेश लामतुरे, शिवराज मंगणे व सर्व शिक्षक वृंद यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments