कोकळगाव मध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मोहरम उत्साहात संपन्न
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा : हिंदू-मुस्लिम समाजातील ऐक्याचे प्रतिक असलेला कोकळगाव येथील मोहरम उत्साहात साजरा करण्यात आला.स्वारी विसर्जनाचा सोहळा बुधवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी अनेक भाविकांनी हजेरी लावली. चार पिढ्यापासून स्वारी बसवणे सोहळा प्रसिध्द आहे.
मोहरम ही परंपरा आजही पाळण्यात येते. मोहरम हा मुस्लिम समाजाचा सण असला तरी या सणाचा मान हिंदूंकडेही आहे.
मोहरमनिमित्त सवाल म्हणजेच काव्य रचना करत हिंदू-मुस्लिम ऐक्य घडविण्याचे काम तत्कालिन संत सय्यदपीर साहेब हुसेन पिरजादे यांनी केले.
न्याल्याहद्री, पंजायतन, अलीअकबर, बारमाही, मछलीपिर, हुसेन पाशा, नालसाब, डोली आदीं स्वारी बसवले जातात पाच दिवस उत्साहपूर्ण वातावरणात धूल्ला, पैत्रा आदीं खेळ खेळून स्वारीचें विसर्जन करतात.यावेळी तालुययासह जिल्ह्याच्या अनेक भागातील नागरिक हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित असतात.विसर्जनाच्या दिवशी पोलीस प्रशासनाचा पहारा दिसून आला.
0 Comments