सर्पमित्र अनिल गरुड याने वाचवले उदमांजराचे प्राण
मुख्य संपादक : द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा: निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथिल संतोष बिराजदार यांच्या शेतातील १२५ फूट खोल विहीरीत उदमांजर पडले होते. सर्पमीत्र अनिल गरुड यांना भ्रमणध्वनीद्वारे कळवण्यात आले असता,घटनेचे गांभीर्य ओळखून अनिल गरुड, वैभव गरुड व आकाश गवळी यांनी अटोकाट प्रयत्न करून त्या उदमांजराला बाहेर काढले.
उदमांजर (मरनागीन) हा प्राणि झाडावरील फळे तसेच सडलेले प्रेत व मांस खाऊन गुजरान करतो . हा प्राणी तीन ते चार पिलांना जन्म देतो व दगड धोंडे व कपारीमधे वास्तव्य करतो . हा प्राणी निशाचर असून यापासून मानसाला कुठलाच धोका नसतो या प्राप्याविषयी बऱ्याच चूकीच्या अंधश्रद्धा मानल्या जातात परंतू त्या खऱ्या नाहीत पर्यावरणातील हा प्राणी एक अनमोल घटक आहे व शेतकऱ्याचा मीत्र आहे. शेतातील उंदीर खाण्याचे काम करतो व आपले अन्न शोधण्यासाठी रात्रीच बाहेर पडतो 'वाढती लोकसंख्या व शिकारी यामुळे हा प्राणी दुर्मीळ होत चाललेला आहे याला वाचवने ही काळाची गरज आहे. या प्राण्याला अनिल गरूड , वैभव गरूड व आकाश गवळी यानी निसर्गमुक्त केले.



0 Comments