Hot Posts

6/recent/ticker-posts

दहावीच्या परीक्षेत द्रोणाचार्य क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश !

 दहावीच्या परीक्षेत द्रोणाचार्य क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश ! 





मुख्य संपादक :  द्रोणाचार्य कोळी 

9822041174 



निलंगा: निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथिल द्रोणाचार्य क्लासेस च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.

लाटे श्वेता विलास 89.80 % , आगलावे अंकिता अनिल 77. 20 % , मेहकरे ओमकार अंकुश  79.80 % मार्क्स मिळवून यश संपादन केले आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत ग्रामीण भागातील द्रोणाचार्य क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत चमकदार कामगिरी करुन हे दाखवून दिले आहे की जिद्दीला सीमा नसते, असे क्लासेसचे संचालक द्रोणाचार्य कोळी सर  यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांना क्लासेस तर्फे परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्यात आले होते. त्याचा मुलांना फायदा झाल्याचे पालक आणि मुलांनी आवर्जून सांगितले. 



  घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट, व अनेक विदयार्थी  घरचे, आणि शेतातील कामे  करून शाळेत जाऊन अभ्यास करून असे घवघवीत यश प्राप्त करणाऱ्या द्रोणाचार्य क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्यांच्या साठी नुसते पास होणे सुद्धा बोर्डात येण्यासारखे कौतुकास्पद आहे. तरीही कितीतरी मुलांना फर्स्ट क्लास मिळाले आहे. आणि वरील विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळवले आहेत. 

या सर्व  विद्यार्थ्यांचे क्लासेसच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments