लोकाधिकार संघाचा विस्तार मध्यप्रदेशात
मध्यप्रदेश प्रदेशाध्यक्षपदी श्री हरीश प्रल्हाद जोशी यांची नियुक्ती
मुख्य संपादक: द्रोणाचार्य कोळी
9822041174
लातूर: लोकाधिकार संघ या संघटनेचा विस्तार आता महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देशातील वेगवेगळ्या प्रांतात होण्यास प्रारंभ झाला आहे.
लोकाधिकार संघ या संघटनेच्या मध्यप्रदेश प्रांताच्या प्रदेशाध्यक्षपदी श्री. हरीश प्रल्हाद जोशी रा. गरोठ जि. मंदसौर यांची नियुक्ती लोकाधिकारप्रमुख मा. श्री व्यंकटराव पनाळे यांनी केली आहे.
श्री. हरीश प्रल्हाद जोशी यांना मध्यप्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त केल्याचे नियुक्तीपत्र लोकाधिकार संघाचे प्रमुख मा. श्री. व्यंकटराव पनाळे साहेब यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
लोकाधिकार संघ या संघटनेचा विस्तार लोकाधिकारप्रमुख मा. श्री. व्यंकटरावजी पनाळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर विविध प्रांतात सुरू झाला असल्याचे लोकाधिकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री. हणमंतराव शेळके यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
0 Comments