Advertisement

हंडरगुळीच्या शिवाजी विद्यालयाचे नियोजन सराव परिक्षेच्या माध्यमातुन चुका सुधारण्यासाठी माॅडेल उत्तरपत्रिका

 हंडरगुळीच्या शिवाजी विद्यालयाचे नियोजन

सराव परिक्षेच्या माध्यमातुन चुका सुधारण्यासाठी माॅडेल उत्तरपत्रिका 



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


  हंडरगुळी : विद्यार्थ्यांचे भविष्य ठरविणारी परिक्षा म्हणजे १०वी,१२वी वर्गाची वार्षिक परिक्षा.आणि यासाठी हाॅल मध्ये गेल्यानंतर जेंव्हा पेपर हातात पडतो तेंव्हा अनेक विद्यार्थ्यांच्या मना मध्ये ना-ना त-हेच्या विचारांचे काहूर माजते.तसेच सर्वप्रथम नाव,नंबर लिहतानाच अनेक विद्यार्थ्यांचे हात थरथरतात.तसेच उत्तरेही व्यवस्थित लक्षात राहत नाहीत.म्हणुन उत्तर चुकतात.परिणामी मार्क्स घटतात.या सारख्या समस्या दुर करुन परिक्षेचा ताण कमी करण्यासाठी हंडरगुळी (ता.उदगीर) येथील शिवाजी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात १०वी व १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी मागच्या कांही दिवसापासून सराव परिक्षेच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका सुधारण्यासाठी माॅडेल उत्तर पञिका हे अभियान सुरु करण्यात आले असून याचा लाभ विद्यार्थ्यांना परिक्षेत नक्कीच होऊ शकतो.असा विश्वास रफिक सय्यद (मु.अ) यांनी व्यक्त केला आहे.

माध्यामिक व उच्च माध्यामिक शि. मंडळाद्वारे १२वीच्या १०तर १०वी च्या २० फेब्रूवारी पासून लेखीपरिक्षा घेण्यात येणार आहेत.म्हणुन परिक्षेचे दिवस जसजसे जवळ येतात तसतसे विद्यार्थ्यांच्या मनात विचारांचे भीती वाढते.ही भीती दुर करण्यासाठी सर्व पेपर्स कसे सोडवावेत.परिक्षेचा ताण भीती कशी पळवावी.यासाठी मु.अ. व स्टाफने मिळून सराव परिक्षा हा उपक्रम सुरु केला आणि यातुन सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका दुरुस्त करण्यासाठी माॅडेल उत्तरपञिका हा विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणारा नव उपक्रम हंडरगुळीच्या शिवाजी शाळे मध्ये सुरु करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांसाठी कांही टिप्स..

परिक्षेत यशस्वी होण्यासाठी १०वी व १२वीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी शांत व प्रसन्न वातावरण निवडावे. मोबाईल,गाणे यांचा वापर टाळावा. पाठ केलेले ध्यानात राहण्याकरीता योगा व धान्य करावा.तसेच पचनास हलके व संतुलित अन्न ग्रहन करावे. अवघड वाटणारे विषय समजावेत यासाठी त्या-त्या विषयाच्या सरांचे मार्गदर्शन घ्यावे.कल करे सो आज कर..या प्रमाणे अभ्यासाचे नियोजन करावे आणि मी परिक्षेत उतीर्ण होणारच.असा सकारात्मक विचार करावा.विशेष मनावरील ताण कमी होण्यासाठी आवडता छंदही पाळावा

आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थी व विद्यार्थीनींवर परिक्षेचा ताण वाढला आहे.पेपर कसा जाईल.ही पेपरच्या दिवशीची अनामिक भीती दुर व्हावी व त्यांची तयारी चांगली यावी आणि निगेटिव्ह विचार नाहीसे व्हावेत.या करीता सराव परिक्षेचा उपक्रम सुरु केलो असून विद्यार्थ्यांच्या चुका दुर करण्यासाठी माॅडेल उत्तर पञिकेच्या माध्यमातुन पेपर तपासून त्या चुका दाखवून त्या दुरुस्त करुन घेतोत. तसेच ३ तासाचा पेपर पावणेतीन तासात योग्य प्रकारे सोडवायचा कसा?या बद्दल या माध्यमातुन योग्य मार्गदर्शन करत आहोत.विशेषत: विद्यार्थ्यांची बुध्दी तसेच मन स्ट्राॅंग होण्याबरोबरच गुरु म्हणुन आमचाही विद्यार्थ्यांबद्दलचा विश्वास वाढत चालला आहे.अशी माहिती

रफिक सय्यद (मु.अ.तथा प्राचार्य) यांनी दिली.

Post a Comment

0 Comments