पत्रकार द्रोणाचार्य कोळी यांची द रिंगण लाईव्ह कार्यालयास सदिच्छा भेट
लातूर : गुरूवार दिनांक १८ डिसेंबर रोजी ग्रामीण वार्ता पत्र न्युज चे मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी यांची मराठवाड्यातील जनतेच्या मनातील सर्वात अग्रेसर असलेल्या आवाज महाराष्ट्राचा द रिंगण लाईव्हचे,मुख्य संपादक सन्माननीय राजु पाटील यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट देऊन सविस्तर चर्चा केली.पत्रकार कार्यालयाला सदिच्छा भेट देणे म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेचा आदर करणे, पत्रकारांच्या समस्या समजून घेणे आणि त्यांना पाठिंबा देणे होय. या भेटीदरम्यान, संघटन पत्रकारांच्या हक्कांसाठी करत असलेल्या कार्याचे कौतुक करणे, सत्यनिष्ठ पत्रकारितेचा पुरस्कार करणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शुभेच्छा देणे यासारख्या गोष्टींचा समावेश असतो. लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेच्या महत्त्वपूर्ण कार्याला सलाम करण्यासाठी, सदिच्छा भेट देऊन, राजु पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरवडी येथील उद्योजक जगन्नाथ मनाळे, दिनकर सूर्यवंशी व रिंगण लाईव्ह कार्यालयाची टीम यांची उपस्थिती होती.



0 Comments