शेतकरी बांधवांसाठी उत्सव असलेली वेळ अमावस्या हंडरगुळीत संपन्न
घरंदारं बंद;शेतशिवार हाऊस फुल्लं
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
प्रतिनिधी/ विठ्ठल पाटील
हंडरगुळी : अमावस्या दिवशी कुणीही कोणतेही शुभ कार्य करु नये.अशी खुप जुनी परंपरा असल्याने अमावस्या म्हणजे जगासाठी अंधारच!असे म्हटले तर चूक ठरु नये.पण हीच अमावस्या शेतकरीबांधवांसाठी काळ्याआईची पुजा करणारा सण असतो.आणी हा सण हंडरगुळी शिवारात मोठ्या भक्तीमय व उत्सहात दि.१९ रोजी संपन्न झाला.
या दिवशी गावागावात,गल्लीबोळात व बाजारपेठेत सन्नाटा होता.तर शेत शिवार रंगीबेरंगी दिसत होता.
कारण,शेतकरी कुटूंबिय व त्यांचे आप्तेष्ठ,मिञ मंडळी रंगीबेरंगी ड्रेस परिधान केले होते.म्हणुन सगळा शेत शिवार फुलून दिसत होता.
अमावस्या म्हटल की अनेकजण नाकं मुरडतात.पण दर वर्षी येणारी वेळ अमावस्या ही शेतक-यांसाठी काळ्याआईची पुजा करणारा सण असतो.या दिवशी कडब्याच्या ५पेंडी ची १कोप करुन तसेच ५दगडांना (पांडव) चुना लावुन त्याची विधीवत पुजा करतात.नंतर निमंञितांना आंबील,भज्जी,आंबट,गोड खीर, पातीचा कांदा,हिरवी मिरचीचा ठेचा यांची मेजवानी दिली जाते.आणि भारतीय बैठकीसारखी पंगत बसून आरोग्यदायी व स्वादिष्ट वनभोजन घेतले जाते.
ना मंदीर ना मुर्ती तरीही शेताशेतात काळ्या आईची व उभ्या पिकांची मनोभावे पुजा करुण जगासाठी काळी अमावस्या पण शेतक-यांसाठी काळ्या आईची पुजा व सेवा करणारी वेळ अमावस्या मोठ्या आनंदी व भक्तीमय वातावरणात संपन्न झाली.



0 Comments